आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी समताचे सरव्यवस्थापक सचिन भट्टड यांची निवड:- संदीप कोयटे, संचालक…

कोपरगाव प्रतिनिधी:- नॅशनल को – ऑप. क्रेडिट युनियन फेडरेशन ऑफ कोरियाच्यावतीने २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेचे सरव्यवस्थापक सचिन भट्टड यांची निवड झाली असून कोपरगाव तालुक्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याची माहिती संस्थेचे संचालक संदीप ओमप्रकाश कोयटे यांनी दिली.ते पुढे म्हणाले […]

Read More

एक दिवस देशासाठी, देशाच्या विजयासाठी भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाचे साक्षीदार व्हा आ.आशुतोष काळेंच्या सहकार्याने क्रिकेट रसिकांसाठी विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना भव्य एलईडी स्क्रीनवर…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – विश्वचषक स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश केला असून रविवार (दि.१९) रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध हा अंतिम सामना होणार आहे.या सामन्याचे एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण कोपरगावकरांना पहाण्याची सुवर्णसंधी आ.आशुतोष काळे यांनी उपलब्ध करून देण्यात आली आहे हा अंतिम सामना पाहण्यासाठी या ठिकाणी आ.आशुतोष काळे स्वतः उपस्थित राहणार […]

Read More

पाझर तलावात पाणी सोडल्याशिवाय उपोषण मागे नाही, उपोषणास पाठिंब्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको…

कोपरगाव प्रतिनिधी:-(रांजणगाव देशमुख):- निळवंडेच्या पाण्याने पाझर तलाव भरून द्यावे या मागणीसाठी कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणला पाठिंबा देण्यासाठी लाभधारक शेतकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जो पर्यंत कोपरगाव तालुक्यातील पाझर तलावात पाणी सुरू होत नाही तो पर्यंत आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही असा इशारा उपोषणकर्त्यांच्या वतीने अँड. योगेश […]

Read More

संवत्सरचे ज्येष्ठ कार्यकर्ते भगवंतराव भाकरे यांचे निधन…

कोपरगाव प्रतिनिधी:-संवत्सर येथील लक्ष्मणवाडी परिसरातील प्रगतशील शेतकरी व ज्येष्ठ कार्यकर्ते भगवतराव देवराम भाकरे यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ९५ वर्षे होते. त्यांच्यावर गुरुवारी सायंकाळी संवत्सर येथे गोदावरी काठावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत.स्व. नामदेवराव परजणे पाटील आण्णा यांचे विश्वासू सहकारी म्हणून कै. भगवंतराव भाकरे पंचक्रोशीत परिचित होते. प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते म्हणून […]

Read More

शेतकरी हित हाच आपला केंद्रबिंदू:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना व सहकार रत्न शंकरराव कोल्हे सहकारी संघ यांच्या वतीने चारा पीक बियाणे १००% अनुदानावर वितरण व महाबीज गहू आणि हरभरा बियाणे शासकीय अनुदानित दराने वितरण सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या शुभहस्ते सुरू करण्यात आले. या वेळी बोलताना विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की चारा […]

Read More

सौ. सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचीआंतरविभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ विजया गुरसळ यांनी दिली आहे.कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शेवगाव येथे झालेल्या […]

Read More

निळवंडेच्या पाण्यासाठी रांजणगावात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरूउपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज रास्ता रोको…

कोपरगाव प्रतिनिधी(रांजणगाव देशमुख):- निळवंडे लाभक्षेत्र हे आवर्षण प्रवर्षण ग्रस्त असून कायमच हा भाग दुष्काळाच्या झळा सोसत आला आहे. निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. पंरतु कोपरगाव तालुक्यातील एकही पाझर तलाव या पाण्याने भरला गेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष असल्याने या परिसरातील सर्व गावातील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरूण देण्याच्या मागणीसाठी कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख […]

Read More

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत विवेकभैय्या कोल्हे यांनी मांडले विविध प्रश्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली.या वेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी उपस्थित राहून शेतकरी बांधवांच्या भावना मांडत पाट पाण्याचे आवर्तनांचे नियोजन काटेकोर करण्याची मागणी लाऊन धरली.रब्बीचे २ आवर्तन सोडले जाणार असल्याचा निर्णय झाला असून उन्हाळी आवर्तना बाबत देखील योग्य […]

Read More

आ.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नाचे फलित निळवंडे डाव्या कालव्यातून अतिरिक्त १.५ टीएमसी पाणी मिळणार, सर्व पाझर तलाव भरले जावून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील सर्व गावांतील पाझर तलाव भरले जावून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी आ. आशुतोष काळे यांच्या सुरु असलेला सततचा पाठपुरावा व अविरत प्रयत्नांना यश मिळाले असून लाभ क्षेत्रातील सर्व गावांतील पाझर तलाव भरण्यासाठी अतिरिक्त १.५ टीएमसी पाणी देण्यास मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती आ.आशुतोष काळे यांनी […]

Read More

जायकवाडी धरणात पाणी न सोडण्याचा ठराव मंजूर करूनशासनास सादर करावाआशुतोष काळेंची कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत महत्वपूर्ण मागणी,आवर्तन नियोजनात विस्कळीतपणाहोणार नाही याची काळजी घ्यावी:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात अतिशय कमी पर्जन्यमान झाले असून दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या आधारे जायकवाडी धरणात या वर्षी पाणी सोडण्याची आवश्यकता नाही. त्याबाबतचा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये ठराव मंजूर करून शासनास सादर करावा अशी महत्वपूर्ण मागणी आशुतोष काळे यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली. […]

Read More