श्री गणेश कारखान्याच्या एक लाख एकावन्न हजार साखर पोत्यांचे विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते पूजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीगणेश सह साखर कारखाना प्रगती करत असून कारखाना कार्यस्थळावर नुकतेच एक लाख एकावन्न हजार साखर पोत्यांचे पूजन जिल्हा बँकेचे संचालक युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.शेतकरी सभासदांच्या अपेक्षांचा विश्वास जोपासून श्रीगणेश कारखान्याची अनेक संकटे आल्यानंतर देखील ही यशस्वी वाटचाल सुरू आहे.या प्रगतीमध्ये सर्वांचे मोलाचे योगदान आहे. अनेक बदल करून नाविन्यता आणत काम सुरू […]

Read More

काकडी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील न्यू इंग्लिश स्कूल काकडी विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना आगामी परीक्षेसाठी शुभेच्छा व विद्यालयाकडून निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख मान्यवरांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जवळके धोंडेवाडी येथील शेतकरी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बंडू गायकर होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कर्मवीर […]

Read More

पाटबंधारे विभागाच्या विविध प्रश्नांकडे आ. आशुतोष काळेंनी वेधले लक्ष, जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटलांनी दिला सकारात्मक प्रतिसाद…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार मतदारसंघातील पाटबंधारे विभागाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटलांकडे केली होती. त्या मागणीनुसार बुधवार (दि.१२) रोजी मुंबई येथे जलसंपदा मंत्र्यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीत आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले […]

Read More

ज्योती प्रकाश फाउंडेशन चे अध्यक्ष, जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे विश्वस्त प्रकाशची भट यांच्याकडून दिव्यांग बांधवांना किराणा किटचे वाटप…

कोपरगाव प्रतिनिधी :-ज्योती प्रकाश फाउंडेशन चे अध्यक्ष तसेच जंगली महाराज आश्रम ट्रस्ट चे विश्वस्त माननीय प्रकाशची भट साहेबांनी १२ फेब्रुवारी २०२५ रोजी कोल्हार(भगवतीपूर)येथील ४० दिव्यांग कुटुंबीयांना किराणा किटचे वाटप केले आहे, दिव्यांग समितीचे अध्यक्ष बाळासाहेब रामचंद्र शिंदे यांनी पत्राद्वारे किराणाचे किट वितरण करुन दिव्यांग बांधवांना मदत करावी अशी मागणी केली होती. लगेच या मागणीचा सहानुभूतीपूर्वक […]

Read More

शहरातील नामांकित वकील स्व.शंकारराव (मामा) आढाव पा.यांचे दुःखद निधन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली:- नारायणशेठ अग्रवाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक 12/02/2025 रोजी शहरातील नामांकित वकील स्व.शंकारराव (मामा) आढाव पा.यांचे दुःखद निधन झाले भावपूर्ण श्रद्धांजली.कोपरगाव पंचक्रोशीत ते (मामा) या नावाने प्रसिद्ध होते.एक प्रगतिशील व अभ्यासू शेतकरी म्हणून त्यांची ख्याती होती कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष तसेच कोपरगाव मराठा पंच मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी बरेच दिवस काम पाहिले. संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेल्या विविध कार्यकारी सोसायटीचे अनेक […]

Read More

उद्योजकतेतून स्वतः बरोबर समाजाचाही विकास साधावा:- विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे…

कोपरगाव प्रतिनिधीराहुरी विद्यापीठ, दि. 12 फेब्रुवारी, 2025डाळ मिलिंग प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतलेल्या प्रशिक्षणार्थींनी या प्रशिक्षणाचा फायदा घेवून आपला स्वतःचा उद्योग सुरु करावा. उद्योग सुरु केल्याने स्वंय रोजगाराबरोबर इतरांनाही रोजगार मिळतो. जास्तीत जास्त युवा उद्योजक तयार व्हावेत हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. उद्योजकतेतून स्वतः बरोबर समाजाचाही विकास साधता येतो असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार […]

Read More

कोपरगांव वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड. शंकरराव (मामा) आढाव यांचे निधन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष शंकरराव (मामा) सखाराम पा. आढाव (वय ८५) यांचे बुधवार दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ०८:३० वाजता निधन झाले आहे… अॅड. स्व. शंकरराव आढाव यांनी कोपरगांव न्यायालयात ५० वर्षापेक्षा जास्त काळ विधी सेवा दिली. गोदावरी नदी परिसरातील सर्व धरणे प्रत्यक्ष फिरुन कोपरगांवच्या शेती पाण्याच्या अभ्यास केला. गोदावरी कालव्यांवर आधारित […]

Read More

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने जिल्ह्यात स्वराज्य सप्ताहाचे आयोजन:- जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार…

कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने दि.१९ फेब्रुवारी ते दि.२७ फेब्रुवारी दरम्यान “स्वराज्य सप्ताह” साजरा केला जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांनी दिली आहे. नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक जिल्हाध्यक्ष अॅड.पगार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवन येथे संपन्न झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार दिलीपराव बनकर, आमदार पंकजभाऊ भुजबळ, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, बाळासाहेब […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या सात अभियंत्यांची जे. एस. कंट्रोल कंपनीत नेाकरीसाठी निवड ; एका पाठोपाठ कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवुन देवुन संजीवनीची धडाकेबाज कामगिरी…

कोपरगांव प्रतिनिधी :- जशी इंजिनिअरींगच्या शेवटच्या सत्राची सुरूवात होते, तसा संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजचा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने पूर्व नियोजीत कंपन्यांशी केलेला संपर्क प्रत्यक्ष कृतित यायला सुरूवात होते. याचाच परीणाम म्हणुन अलिकडेच जे. एस. कंट्रोत प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले होते. या ड्राईव्ह अंतर्गत कंपनीने सात नवोदित अभियंत्यांची निवड करून संजीवनीचे अभियंते लागलीच […]

Read More

राष्ट्रीय कृषी विकास व मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनांचे अनुदान तात्काळ वर्ग करा:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – राष्ट्रीय कृषी विकास योजना व मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनांच्या अनुदानापासून कोपरगाव तालुक्यातील ८४२ शेतकरी वंचित राहिले आहे.शेतकर्‍यांनी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करूनही त्यांचे अनुदान आजपर्यंत त्यांना मिळालेले नाही.त्यामुळे ‘राष्ट्रीय कृषी विकास योजना’ व ‘मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचे’ अनुदान तातडीने लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी […]

Read More