
कोपरगाव प्रतिनिधी:-
दिनांक 12/02/2025 रोजी शहरातील नामांकित वकील स्व.शंकारराव (मामा) आढाव पा.यांचे दुःखद निधन झाले भावपूर्ण श्रद्धांजली.
कोपरगाव पंचक्रोशीत ते (मामा) या नावाने प्रसिद्ध होते.
एक प्रगतिशील व अभ्यासू शेतकरी म्हणून त्यांची ख्याती होती कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष तसेच कोपरगाव मराठा पंच मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी बरेच दिवस काम पाहिले. संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेल्या विविध कार्यकारी सोसायटीचे अनेक वर्ष चेअरमन होते या सोसायटीची धुरा त्यांनी अनेक वर्ष यशस्वीपणे सांभाळी आज संपूर्ण महाराष्ट्रात या सोसायटीचा गुणगौरव केला जातो. त्यांनी वृद्ध काळामुळे ही जबाबदारी त्यांचे सुपुत्र वैभव यांच्यावर सोपवली आजही वैभव हे समर्थपणे आपली जबाबदारी पार पाडत आहे. आपल्या वकिली व्यवसायात त्यांनी तत्त्वाशी कधीच तडजोड केली नाही. अत्यंत संयमी व करारी स्वभाव असणारे मामा आपल्यातून गेले याचे कोपरगावकरांना अत्यंत दुःख आहे. मी माझ्या परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली…!
श्री.दिलीपराव कोल्हे पा, श्री.अशोकराव आढाव पा. श्री.पोपटराव नरोडे पा, श्री.शरदराव घाटे पा,श्री.नारायणशेठ अग्रवाल कोपरगाव.
मो 9822630330
