पतंग उत्सवात नायलॉन धागा वापरण्यास व बाळगण्यास बंदी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे कारवाईचे संकेत…

अहमदनगर

पतंग उत्सवात नायलॉन धागा वापरण्यास व बाळगण्यास बंदी
पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे कारवाईचे संकेत

कोपरगाव शहरात पतंग बाजीसाठी नायलॉन धागा वापरण्यास व बाळगण्यास बंदी असून साधा पारंपारिक वापरण्याचे आवाहन कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक हर्षवर्धनजी गवळी यांनी केले आहे.

   पतंगबाजीसाठी नायलॉन अथवा तंगुस धागा वापरणारे किंवा बाळगणारे यांच्यावर यापुढे कारवाई होणार असून लहान मुलांकडे नायलॉन अथवा तंगुस धागा आढळून आल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई होणार आहे.
     कोपरगाव शहरातील ज्या इमारतींवर नायलॉन धागा आसारी आढळून येईल. त्या इमारत मालकांवर कारवाई होणार आहे.तसेच नायलॉन अथवा तंगुस धागा वापरणाऱ्या किंवा त्याचा साठा करणाऱ्या व्यक्तींची माहिती कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला द्यावी संबंधित इसमाचे नाव गोपनीय ठेवून त्याला योग्य ते बक्षीसही दिले जाणार आहे. मा.न्यायालयाचे निर्देश पालन करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.असे आवाहन करुन कोपरगाव शहरातील नागरिकांना कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे वतीने   मकरसंक्रांती उत्सवाच्या शुभेच्छा पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी शेवटी व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *