
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. रामदासजी आव्हाड यांची सलग सातव्या वेळेस राष्ट्रीय गुरुपदी निवड झाल्याबद्दल माजी नगराध्यक्ष श्री.मंगेशराव पाटील, सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी त्यांचा सन्मान केला आहे…कोरोना संकट काळात डॉ.रामदासजी आव्हाड व त्यांचे सहकारी यांनी लोकसेवेत मदतकार्य करणार्या विविध खातेनिहाय अधिकारी व कर्मचारी यांना लाखो रुपयांची मोफत औषधांचे वितरण केल्याबद्दल आभार मानले…
