
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक गावांमध्ये श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या निधीतून रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. यामध्ये प्रमुख रस्त्यांसह वाड्या वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचा देखील समावेश आहे. मतदार संघातील इतर गावांप्रमाणे रस्ते विकासापासून दुर्लक्षित असलेल्या कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना देखील ना. आशुतोष काळे यानी न्याय दिला असून नुकतेच त्यांच्या हस्ते ७४ लाख रुपये निधी खर्चाच्या रस्त्यांचे भूमीपूजन करण्यात आले आहे. यामध्ये तळेगाव मळे येथे रमेश पिंपळे घर ते रमेश जाधव घर रस्ता व नंदाराम वैद्य घर ते मंजाहारी टुपके घर रस्ता मजबूतीकरण करणे ३४ लाख आणि खोपडी येथे ४० लाख निधीतून ईजिमा २१४ मच्छिन्द्र भवर घर ते भारत संत घर रस्ता व बाळासाहेब नवले घर ते पुंजाहारी वारकर घर रस्ता मजबुतीकरण करणे या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहम, संचालक बाळासाहेब बारहाते, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, गोपाळराव भवर, तळेगाव मळेचे सरपंच सचिन क्षिररसागर, खोपडीचे सरपंच संभाजी नवले, उपसरपंच शिवाजी वारकर, आर.टी. भवर, रामदास टुपके, भाऊसाहेब भवर, आबा डुकरे, गोरख भवर, नानासाहेब भवर, जनार्दन टुपके, ऋषिकेश वाकचौरे, साईनाथ जाधव, रामदास उकिरडे, पुंजाराम जाधव, सिताराम वाघचौरे, अशोक बर्डे, बाबासाहेब डुकरे, सोपान उकिरडे, दादा टूपके, भानुदास वाकचौरे, वाल्मिक जाधव, प्रकाश बर्डे, वाल्मिक पिंपळे, दगू बर्डे, अशोक टुपके, रघुनाथ टूपके, चांगदेव उकिरडे, रघुनाथ जाधव, पांडुरंग भोसले, किरण भवर, महेंद्र टुपके, भरत जाधव, गोरख वैद्य, साहेबराव आभाळे, भानुदास भवर, ईश्वर जाधव, सुभाष नरोडे, अप्पासाहेब निकम, केशव जोशी, संतोष ठुबे, रोहिदास जाधव, चांगदेव नवले, शहाबाई जाधव, बाळासाहेब वारकर, बाळासाहेब जाधव, जालिंदर वारकर, बाळासाहेब मच्छिंद्र वारकर, आप्पासाहेब वारकर, पुंजाहरी वारकर, अण्णासाहेब जाधव, अशोक घेमुड, बाबासाहेब नवले, मनोज जगताप, जगन नवले, साईनाथ शेवाळे, सोमनाथ वारकर, ओमकार वारकर, जालिंदर जाधव, राहुल नवले, राजेंद्र दुशिंग, नितीन भवर, मनोज जेजुरकर, तात्यासाहेब जाधव, अशोक नवले, कोंडीराम वारकर, संदीप वारकर, नवनाथ जेजुरकर, बाबासाहेब नवले, सिद्धेश्वर वारकर, सागर भवर, दीपक नवले, घनश्याम उंडे, शिवाजी वारकर, गणपत वारकर, किशोर वारकर, संदीप जाधव, नवनाथ वारकर, कडूबापू त्रिभुवन, ज्ञानेश्वर वारकर, भास्कर वारकर, दादासाहेब वारकर, बापू वारकर, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता दहिफळे, ठेकेदार हर्षद बोर्डे, विष्णू पवार, किरण पवार, दत्तात्रय गायकवाड, रामदास गुंजाळ, हिरामण गुंजाळ, तळेगाव मळेच्या ग्रामसेविका सौ. वडीतके, खोपडीच्या ग्रामसेविका रंजना शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


फोटो ओळ:- तळेगाव मळे, खोपडी येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन प्रसंगी ना. आशुतोष काळे व मान्यवर.
