
सवंग लोकप्रियतेसाठी विरोधकांनी खोटी माहिती देन्या आधी सत्यता पडताळून पहावी:- अरिफ कुरेशी…
कोपरगाव प्रतिनीधी:-
आम्ही भलेही अडानी असू पण आमच्या वाडवडिलांनी आम्हाला दलबदलू पणi शिकवला नाही , कोल्हे गटाशी प्रामाणिक राहून विकास साधलेला आहे. नगरपालिका शहर विकास अंतर्गत आमदार आशूतोष काळे व त्यांचे समर्थक शहरवासीयांना ५ कोटी रस्ते कामासाठी चुकीची माहिती देऊन फसवणूक करत आहेत त्यांनी 12 कोटी रुपये तर सोडाच १२ रुपये सुद्धा विकास निधी दिलेला नाही, खोट बोल पण रेटून बोल अशी केविलवाणी अवस्था सध्या विरोधकांची झाली आहे, जनतेला माहिती देण्या अगोदर त्यांनी त्याची सत्यता पडताळून पहावी असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी यांनी केले आहे.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की कोपरगाव पालिका सभागृहात भाजपा शिवसेना नगरसेवकांनी प्रत्येक विकासाचे ठरावाला मंजुरी दिलेल्या आहेत त्यानुसारच प्रत्येक प्रभागातील कामे होत आहेत, आमच्यावर टीका करणाऱ्यांनी त्यांचा इतिहास तपासावा. खोटं कधी जास्त दिवस टिकत नसते. 14 वा वित्त आयोगाचा निधी बाबत आम्ही सत्यता समोर आणल्या मुळेच त्यांच्या समर्थकांना मिरच्या झोंबल्या आहेत. प्रभागातील कामे नेगरसवकांची पण त्याचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे, अमचेवर आरोप करणारे स्वतःला उच्चविद्याविभूषित समजतात, त्यांच्या तोंडी असे अकलेचे तारे तोडणारी भाषा शोभत नाही. त्यांनी अजूनही या विकास निधी बद्दल अभ्यास करावा, मगच आरोप करावेत. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शहर विकासासाठी प्रस्ताव देऊन त्यासाठी निधी आणून कामे मार्गी लावली, याउलट आमदार काळे यांनी असे किती प्रस्ताव मार्गी लावले आणि त्यांनी कुठली कामे सुरू केली, याची माहिती त्यांच्या समर्थकांनी अगोदर जाणून घ्यावी असे आरिफ कुरेशी यांनी शेवटी म्हटले आहे.
