
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरात डॉ. दत्तात्रयजी मुळे, डॉ. चंद्रशेखरजी आव्हाड, डॉ. प्रविणजी गायकवाड, डॉ. शिरीषजी मुळे, डॉ. सुनीलजी पवार व श्री. नारायणजी दाणे यांनी नव्याने सुरू केलेल्या साइसेवा सी.टी. स्कॅन सेंटरचे उदघाटन दि.६ सप्टेंबर रोजी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते पार पडले.


यावेळी राहुरीचे प्रांताधिकारी डॉ. दयानंदजी जगताप, जिल्हा परिषद सदस्य राजेशजी परजणे, राहुलजी रोहमारे, कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेकजी कोल्हे, डॉ. महेंद्रजी गोंधळी, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनीलजी गंगूले, नगरसेवक गटनेते विरेनजी बोरावके, मंदारजी पहाडे, राजेंद्रजी वाकचौरे, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनीलजी शिलेदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाजभाई कुरेशी, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णाजी फुलसुंदर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकासजी घोलप, डॉ. अजयजी गर्जे, डॉ. तुषारजी गलांडे, डॉ. अमोलजी अजमेरे, डॉ. अतिषजी काळे, डॉ. दीपकजी पगारे, दिनारजी कुदळे, संदीपजी कपिले, राहुलजी देवळालीकर, कार्तिकजी सरदार, प्रशांतजी वाबळे, नारायणजी लांडगे, मुकुंदजी इंगळे, राजेंद्रजी आभाळे आदी उपस्थित होते.
