आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये पत्रकार दिन साजरा, तालुक्यातील सर्व पत्रकारांची व कुटुंबाची मोफत तपासणी होणार:- आत्मा मलिक हॉस्पिटल आणि साईबाबा मेडिकल हब चेअरमन सुमनजी…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे आत्मा मलिक हॉस्पिटल आणि साईबाबा मेडिकल हब या हॉस्पिटलमध्ये रविवार 9 जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर
व साईबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर पत्रकार प्रतिनिधी म्हणून साहेबराव दवंगे, जनार्दन जगताप,आत्मा मलिक
हॉस्पिटल आणि साईबाबा मेडिकल हबचे चेअरमन तथा साईधाम ट्रस्ट मुंबई चे अध्यक्ष सुमनजी,व्यवस्थापक कांचन कदम,एम.डी मेडिसिन डॉ. हर्षद आढाव,स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.इंद्रनील वाघ उपस्थित होते.

हॉस्पिटलचे चेअरमन सुमनजी यांनी पत्रकारांना संबोधित करतांना म्हणाले की.4 महिन्यांपूर्वी हे आत्मा मलिक हॉस्पिटल 30 वर्षाच्या करारावर घेतले असून.ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी साईबाबा मेडिकल हब हे नाव देण्यात आले. घेतल्यानंतर हॉस्पिटलमधील परिस्थितिचा आढावा घेण्यात आला. ज्या सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध नव्हत्या सिटीस्कॅन,एम.आर.आय,
कॅथलॅब,सोनोग्राफी, व ईतर काही सुविधा नव्याने मागवण्यात आल्या आहे. त्या लवकरच सुरू होतील.कोरोनाच्या रुग्णांनसाठी 50 बेड आरक्षित ठेवले आहे. ICU मध्ये 10 बेड आहे.NICU मध्ये 5 बेड आहे.महात्मा जोतिबा फुले जण आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना चालू आहे.एखादा रुग्ण कोणत्याच योजनेत बसत नसल्यास व खूप बिकट परिस्थिती असलेल्या रुग्णाचा सर्व खर्च साईधाम ट्रस्ट मार्फत केला जातो.काही दिवसांपूर्वीच मध्यप्रदेश मधील रामरूपराज ही महिला महाराष्ट्रात वास्तव्यास होती पण तिच्याकडे महाराष्ट्रात राहत असल्याचा कोणताही पुरावा नव्हता.तिच्या 1 किलो वजनाच्या बाळाला बालरोगतज्ञ डॉ.यांनी जीवदान दिले.तिच्या बाळाच्या उपचाराचा सर्व खर्च साई धाम ट्रस्टने केला.महिलांची नॉर्मल डिलिव्हरी
पूर्णपणे मोफत केली जाते.शिर्डी एअरपोर्ट मधील सर्व स्टाफचे आरोग्य तपासणी व समृद्धी महामार्गच्या कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी आम्ही घेतली आहे. पुढील काही दिवसांत कोपरगाव तालुक्यातील सर्व पत्रकारांची व त्यांच्या कुटुंबांची मोफत तपासणी तज्ञ डाॕक्टरांकडून केली जाणार आहे लवकरच तारीख निश्चित करून हॉस्पिटलमध्ये सर्वरोग तपासणी शिबीर राबवण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.यात स्त्रीरोगतज्ज्ञ डाॕक्टर इंद्रनिल वाघ,डॉ. MD मेडिसिन हर्षद आढाव, अस्तिरोगतज्ञ अशोक मदने,नेत्ररोगतज्ञ डॉ.मेहेबान सिंग,मेंदूरोगतज्ञ डॉ. सुमित हिरे, दंतरोगतज्ञ डॉ.सोनल धोटे,उपस्थित असणार आहे.
यानंतर पत्रकार प्रतिनिधी म्हणून साहेबराव दवंगे सर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की साईबाबा शताब्दी दिनानिमित्त 1 कोटींची स्वागत कमान साई चरणी अर्पण केली. याबद्दल सर्व पत्रकारांच्या वतीने आभार मानतो व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आभार प्रदर्शन व्यवस्थापक कांचन कदम यांनी मानले.शेवटी सर्व पत्रकारांचा शाल,पेन, हॉस्पिटलचे कॅलेंडर देवून चेअरमन सुमनजी यांनी सत्कार केला.यावेळी सर्व पत्रकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *