बहादराबाद येथील जि.प प्राथमिक शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील बहादराबाद येथील  जि. प
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये नेत्रदीपक यश
संपादन केल्याबद्दल त्यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान
करण्यात आला आहे.
 प स सदस्य बाळासाहेब रहाणे,केंद्रप्रमुख आर.के ढेपले,सरपंच विक्रम
पाचोरे आदि प्रमुख यावेळी उपस्थित होते.
यावेळी यु ट्युब चॅनल द्वारे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित स्पर्धेत
प्रोत्साहन पर पारितोषिक कु कार्तिकी सचिन पाचोरे व कु ज्ञानेश्वरी योगेश
पाचोरे या विद्यार्थ्यीनिंना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच
स्फूर्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव द्वारे प्रजासत्ताक दिनानिमित्त
आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल कु
क्षितिजा विक्रम पाचोरे व तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल कु कार्तिकी सचिन
पाचोरे यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.मंथन
प्रज्ञाशोध राज्यस्तरीय स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल
श्रेयस अजित पाचोरे याचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात
आले.विद्यार्थी विकास मंच महाराष्ट्र राज्य समूहाद्वारे आयोजित नाट्य
स्पर्धेत इयत्ता ४ थी च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रतापगडावरील
पराक्रम या नाटिकेस प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून प्रमाणपत्र व पुस्तक
मिळाले या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.
पं स सदस्य बाळासाहेब रहाणे यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या उपक्रमांचे
कौतुक केले व शाळेस सर्वतोपरि मदत करण्याचे आश्वासन दिले, तसेच
केंद्रप्रमुख ढेपले  यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले व
शाळेतील भौतिक सुविधांबद्दल समाधान व्यक्त करून काही मार्गदर्शक सुचना
केल्या
प्रास्तविक सरपंच विक्रम पाचोरे यांनी केले.
यावेळी सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त
केल्याबद्दल व योग्य मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना यशापर्यंत
पोहोचविल्याबद्दल शिक्षीका स्वाती गुळवे  यांचा ग्रामस्थांच्या वतीने
सत्कार करण्यात आला.यावेळी इंग्रजी माध्यमातून यावर्षी नव्याने दाखल
झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले, विविध स्पर्धांमध्ये
सहभागी विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला
स्वागत व सुत्रसंचालन   स्वाती गुळवे  यांनी केले. तर आभार मंगला गोपाळे
यांनी मानले
यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष  अजित पाचोरे,आप्पासाहेब पाचोरे,
साहेबराव पाचोरे, दत्तुभाऊ पाचोरे,मिनानाथ जोंधळे,बाळासाहेब पाचोरे,
काकासाहेब पाचोरे, लक्ष्मण पाचोरे, संदिप पाचोरे, सचिन पाचोरे, योगेश
पाचोरे, विनोद पाचोरे, मच्छिंद्र पाचोरे,भाऊसाहेब पाचोरे,दिपक आरोटे,राजू
सरवार, अशोक सरवार यांसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

फोटोओळी:-बहादराबाद ता कोपरगाव येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थीचा गुणगौरव
करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *