अकरा गावातील बिकट रस्त्यांची अवस्था बदलणार:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- २००४ साली राहाता तालुक्यातील अकरा गावे कोपरगाव विधानसभा मतदार संघाला जोडली. त्यावेळी पार पडलेल्या विधानसभा निवणुकीत माजी आमदार अशोकराव काळे यांना अकरा गावातील नागरिकांनी मोठे मताधिक्य देवून निवडून दिले. त्यातून उतराई होण्यासाठी त्यांनी जेवढा निधी कोपरगाव तालुक्यातील गावांना दिला तेवढाच निधी या अकरा गावांसाठी देखील दिला. मात्र मागील पाच वर्षात या अकरा गावातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून हि अवस्था लवकरच बदलणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी चितळी येथे सांगितले.
राहाता तालुक्यातील चितळी रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन नुकतेच आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गौतम सहकारी बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, सरपंच सौ. दीपालीताई वाघ, धनगरवाडीचे सरपंच साहेबराव आदमाने, उपसरपंच अनिल रक्टे, दिलीप चौधरी, आण्णासाहेब कोते, अनिल कोते, विनायक देठे, बाबासाहेब वाघ, रुपेश गायकवाड, अंजाबापू रक्टे, सोसायटी चेअरमन रेवननाथ वाघ, पत्रकार विष्णु वाघ, नितीन वाकचौरे, श्रीरामपूर ग्रामीण पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, महावितरणचे अभियंता सचिन बेंडकुळे, मंडलाधिकारी श्रीमती कावेरी आदिक, कृषी सहाय्यक राजेशजी पऱ्हे आदी उपस्थित होते.

                       पुढे बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, अकरा गावात रस्त्यांची मोठी बिकट परिस्थिती  झालेली आहे.यात बदल करण्यासाठी १०० टक्के प्रयत्न करून गावाच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही दिली. आमची  गावे गोदावरी कालव्याच्या शेवटच्या टोकाला येत असल्यामुळे कालव्यांचे पाणी वेळेवर मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांनी  अडचणी मांडल्या त्यावेळी आ. आशुतोष काळे यांनी गोदावरी कालव्याच्या दुरुस्तीसाठी जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांनी दरवर्षी १०० कोटी रुपये निधी देण्याचे मान्य केले असून त्यापैकी ५५ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. त्या निधीतून कालव्यांच्या दुरुस्तींची कामे होणार आहेत. महाविकास आघाडी सरकारने निळवंडे धरणाच्या कामाला देखील गती देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे हि कामे पूर्ण झाल्यानंतर तुमची अडचण निश्चीतपणे दूर होणार असून तुमच्या पर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी माझे प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले. मतदार संघाचा लोकप्रतिनिधी व रयत शिक्षण संस्थेचा उत्तर विभागाचा अध्यक्ष या नात्याने शाळेच्या अडचणी सोडविणे माझी नैतिक जबाबदारी असून शाळेच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. या अकरा गावातील पुणतांबा, चितळी-दिघी, वाकडी-एकुरखे या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून अनेक रस्त्यांचे प्रस्ताव शासनदरबारी पाठविले असून त्यापैकी बहुतांशी रस्त्यांचे प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून काही रस्त्यांना मंजुरी देखील मिळाली आहे व चितळी ते खैरी या रस्त्याचे देखील काम लवकरच मार्गी लावणार नागरिकांना अपेक्षित असलेल्या असल्याचे आ. आशुतोष काळे यानी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तविक रेवणनाथ वाघ यांनी केले.सूत्रसंचलन दीपक वाघ यांनी केले तर आभार वाकचौरे यांनी मानले.

फोटो ओळ:- चितळी येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन प्रसंगी आ. आशुतोष काळे व मान्यवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *