
विकास कामांसाठी एकजूट ठेवा, चांगले कर्म कधीही वाया जात नाही:- स्नेहलताताई कोल्हे…

काकडी आंतरराष्ट्रीय नकाशावर आल्याने गावच्या विकासाचा नकाशा जागतिक स्तरावर पोहोचवा:- स्नेहलताताई कोल्हे…
कोपरगाव प्रतिनीधी:-
चांगले कर्म कधी वाया जात नसते, गावच्या विकासासाठी सर्वांनी एकजूट ठेवावी, विमानतळाच्या माध्यमातून काकडी हे गाव आंतरराष्ट्रीय नकाशावर आले असून आता गावच्या विकासाचा नकाशा जागतिक स्तरावर पोहोचवा, सर्वांना अभिमान वाटेल असा विकास साधावा असे आवाहन भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले.
तालुक्यातील काकडी मल्हारवाडी डांगेवाडी परिसरातील ८४ लाख रुपये खर्चाच्या मल्हारवाडी ते मनेगाव रस्ता, एलईडी दिवे, मल्हारवाडी स्मशानभूमी पेव्हर ब्लॉक, समाज मंदिर पेव्हर ब्लॉक, मल्हारवाडी रस्ता, मल्हारवाडी गावठाण पाईपलाईन, डांगेवाडी प्राथमिक शाळा खोली बांधकाम, ठोंबरे बोराडे वस्ती रस्ता, मल्हारवाडी सोनवणे वस्ती रस्ता, खंडीझोड वस्ती रस्ता, घेगडमल वस्ती रस्ता, सोनवणे वस्ती पूर्व पाणीपुरवठा, सोनवणे वस्ती पश्चिम हायमॅक्स, आनंदवाडी पाणी साठवण टाकी, सोनवणे वस्ती पाणीपुरवठा, शाळा साहित्य, समाज मंदिर दुरुस्ती या १७ विकासकामांची उद्घाटने, भूमिपूजने, लोकार्पने सौ स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

काकडी विमानतळ प्राधिकरणाकडे कररूपाने थकीत ५ कोटी ५० लाख रुपये मिळण्याबाबत गुरुवारी सौ कोल्हे यांनी विमानकंपनी प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन मागणी केली. कोरोना संकटामुळे काकडी परिसरातील असंख्य सुशिक्षित बेरोजगारांना शिर्डी देवस्थान बंदचा फटका बसला असून त्यांची उपासमार होत आहे, कर्जाऊ वाहने ओढून नेली जात आहे, त्यांच्यासाठी शासनाने धडक कृती कार्यक्रम जाहीर करून मदतीचा हात द्यावा अशी मागणी सौ.कोल्हे यांनी केली.
प्रारंभी सरपंच सौ. पूर्वा रवींद्र गुंजाळ यांनी विकासकामांची माहिती दिली, उपसरपंच भाऊसाहेब सोनवणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कानिफनाथ गुंजाळ यांनी प्रास्ताविक केले. बहादरपुरचे सरपंच कैलास राहणे यांनी कोल्हेंच्या विकास कामांची माहिती देत या भागातील प्रलंबित समस्या मांडल्या व काकडी परिसराची कृषीपंढरी करण्यात माजी मंत्री शंकरराव कोल्हे, युवानेते बिपिनदादा कोल्हे यांचा सिंहाचा वाटा असून पाणी आडवा पाणी जिरवा यामुलमंत्राने येथील रहिवासीयांचा प्रचंड फायदा करून दिला आहे. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, भाजपा तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रम पाचोरे,
पंचायत समितीचे माजी सदस्य गोपाळराव सोनवणे,
भिमराज गुंजाळ, साखरबाई सोनवणे, सुगाबाई सोनवणे, अण्णासाहेब गांगवे (सरपंच मनेगांव), दिगंबर कांडेकर, दत्तात्रय गुंजाळ, बाबासाहेब सोनवणे, प्रवीण गुंजाळ, वाल्मीकराव कांडेकर, दत्तात्रय भालेराव, अशोकराव गुंजाळ, नानासाहेब कांदळकर, शिवराम गुंजाळ, सुनील कांडेकर, कानिफनाथ गुंजाळ, विजय डांगे, रामनाथ वेताळ, आदि उपस्थित होते. प्रमोद व अनिल शिंदे यांनी काकडी परिसरातील गाव वाड्या वस्त्यांना अकराशे वृक्ष देऊन पर्यावरण संतुलनासाठी मोठे पाऊल उचलले बद्दल स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाले की, विकासाचा निधी आणताना मोठी कसरत करावी लागते. त्याचे प्रस्ताव आणि त्यातील त्रुटी दूर करून शासनदरबारी हेलपाटे मारावे लागतात, काम मंजूर झाले की निधीसाठी पुन्हा वेगळा पाठपुरावा करावा लागतो तेव्हा कुठे त्याला मूर्त स्वरूप येते. काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी परिसरातील सर्व ग्रामस्थ अतिशय भाग्यवान असून त्यांच्या कारकिर्दीत एकाच दिवशी सर्वप्रथम ८४ लाख रुपये खर्चाची विकास कामे येथे होत आहे ही ऐतिहासिक बाब आहे. जिरायत भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेले निळवंडेचे काम व्हावे म्हणून माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी सातत्याने जनरेटा देत वेळ प्रसंगी स्वतःच्या शासनाविरुद्ध रस्त्यावर येत संघर्ष करून प्रश्नांची सोडवणूक केली आहे. शेती, शेतकऱ्यांची पिढी जगवण्यासाठी निळवंडेचे ऐतिहासिक काम अंतिम टप्प्यात नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय जलसंपदा मंत्री, तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आदींचा सिंहाचा वाटा आहे. दुष्काळी स्थिती असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, त्याच्या पाट पाण्यासह विजेच्या समस्या प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात असून त्या सोडवण्यासाठी आपण सातत्याने काम करत आहोत. शेतकरी जगला तर तुम्ही आम्ही जगु. माजी मंत्री शंकरराव कोल्हे व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी आजवरच्या दुष्काळी स्थितीत या पश्चिम भागातील गावांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांना सातत्याने मदतीचा हात दिलेला आहे. येथील जनावरांच्या तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक योजना राबून दुष्काळात आधार देण्याचे काम केले आहे. कोरोनाची आपत्ती मोठी आहे दुसऱ्या लाटेत संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे व त्यांच्या टीमने कोपरगाव मतदार संघातील कोरोणा ग्रस्तरुग्णांसाठी मोफत उपचार केंद्र उघडून मदतीचा हात दिला. राजकारणात परिस्थिती नेहमीच बदलत असते. सामान्यांचा मिळवलेला विश्वास टिकवता आला पाहिजे. खुर्च्या जनसामान्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी असतात त्या अडवून एका ठिकाणी बसून कुठल्याही समस्या सुटत नसतात. शेवटी बाबासाहेब सोनवणे यांनी आभार मानले.
चौकट
दांडा एकाचा अन झेंडा दुसऱ्याचा असं करु नका असे सौ स्नेहलता कोल्हे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.



फोटो ओळी:-
तालुक्यातील काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी परिसरातील ८४ लाख रुपये खर्चाच्या १७ विकासकामांची उद्घाटने, भूमिपूजने, लोकार्पने भाजपचे प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.
