
कोपरगाव प्रतिनिधी:-
मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे साहेब यांचेकडून आज देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीम चे आभार व्यक्त करणेत आले. तश्या आशयाचा ई-मेल आज मुख्यमंत्री कार्यालयाकडून आप्पासाहेब ढुस यांना प्राप्त झाला.
देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीम च्या वतीने देवळाली प्रवरा येथे दि. २७ जुलै रोजी मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे साहेब यांचे जन्मदिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करणेत आले होते. त्याबद्दल आज मुख्यमंत्री कार्यालयाकडून आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांना ई-मेल संदेश द्वारे देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीम चे आभार व्यक्त करणेत आले.
या बद्दल सविस्तर माहिती अशी की, रोटरी ब्लड बँक राहुरी यांचे सहकार्याने देवळाली प्रवरा येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला. सकाळी ९.०० वाजता देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजय निकत यांचे हस्ते बाजारतळ येथील आराध्या कॉम्प्लेक्स येथे फित कापून या रक्तदान शिबिराचे उदघाटन झाले. या शिबिरात ५५ रक्तदात्यांनी रक्तदान करून मुख्यमंत्री महोदयांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी सनदी अधिकारी दत्तात्रय कडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, प्रशांत कराळे, अमजद इनामदार, अनिस शेख, वर्षा संसारे, ऋषीकेश संसारे, डॉ. सुनील कदम, सागर सोनवणे आदी मेडिकल हेल्प टीम चे सदस्य हजर होते.
आदरणीय मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांचे जन्मदिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री महोदयांनी कोरोना काळात केलेले कार्य व जनतेला दिलेला धीर पाहता त्यांचे प्रति कृतज्ञता व्यक्त करणेसाठी देवळाली मेडिकल हेल्प टीमच्या वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार यांनी या शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या होत्या. रक्तदानसाठी महिलांची संख्याही लक्षणीय होती. या रक्तदान शिबिरास राहुरी येथील रोटरी ब्लड बँक, राहुरी अर्बन पतसंस्था व देवळाली प्रवरा येथील कर्मवीर करियर अकॅडमी चे संचालक मेजर राजेंद्र कडू यांचे विशेष सहकार्य लाभले होते.
सोसिएल मीडियाच्या माध्यमातून रक्तदान शिबीर बाबतची माहिती मुखमंत्री कार्यालयापर्यंत पोहचली त्याबद्दल आज मुख्यमंत्री कार्यालयाने देवळाली मेडिकल हेल्प टीमचे सदस्य तथा आंतराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांना ई-मेल द्वारे आभार व्यक्त करणारा संदेश प्राप्त झाला.
या निमित्ताने आमचे प्रतिनिधीशी बोलताना आप्पासाहेब ढुस यांनी सांगितले की, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी या घटनेची तात्काळ दखल घेऊन आभार संदेश पाठविल्याने देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीमचा सामाजिक कार्याप्रति उत्साह द्विगुणित झाला असून टीमच्या सर्व सदस्यांसोबत, रोटरी ब्लड बँक, कर्मवीर अकॅडमी आणि ज्या रक्तदात्यांनि रक्तदान केले तसेच हे शिबीर यशस्वी होण्यासाठी ज्यांनी मदत केली असे सर्वजण खऱ्या अर्थाने आज अभिनंदनास पात्र ठरले आहेत. सर्वांचे हार्दिक आभार व धन्यवाद.
