शिवसेना महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या महानगर अध्यक्षपदी मनोज उदावंत…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-
नाशिक शिवसेना महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून शिवसेना महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या महानगर अध्यक्षपदी मनोज उदावंत यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी गायकवाड, शहराध्यक्ष नगरसेवक सुधाकर बडगुजर, नगरसेवक राजेंद्र लवटे, सूर्यकांत लवटे, श्रीमती मोगल, शिवाजी भोर, बाप्पू ताकाटे, डि.जि.सूर्यवंशी, नाना पाटील, राजू सौंदे यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

त्यानुसार महानगर अध्यक्ष मनोज उदावंत, जिल्हा अध्यक्ष (शहर) स्वप्नील पांगरे, जिल्हा अध्यक्ष ( ग्रामीण) अनिल नागरे, जिल्हा चिटणीस संदिप बिर्ला, जिल्हा चिटणीस प्रकाश चिमोटे, जिल्हा उपाअध्यक्ष (ग्रामीण) प्रविण साबळे, जिल्हा उपाअध्यक्ष सचिन आगळे, जिल्हा उपाअध्यक्ष ( ग्रामीण ) निलेश गोराडे जिल्हा उपाअध्यक्ष विश्राम बाबा बच्छाव, जिल्हा संघटक चिराग हाजी, जिल्हा उपसंघटक सतिश मते, निफाड तालुका अध्यक्ष सुलभेश लाटे, सिन्नर तालुका अध्यक्ष महेश शिंदे, उपशहाराध्यक्ष आकाश लवाळे, शहर चिटणीस संदीप कदम, नाशिक तालुकाअध्यक्ष संतोष खाडे, प्रसिद्धी प्रमुख रवींद्र परेकर, सिन्नर तालुका उपाध्यक्ष विलास शिंदे, शहराध्यक्ष सिन्नर तालुका अमोल शिंदे, तर नाशिक तालुका उपाध्यक्षपदी अभिजित तागड यांची निवड करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *