रेमन मेगसेसे पुरस्कार सम्मानित,पाॅंडेचरी राज्याच्या माजी राज्यपाल किरण बेदी यांचा कोपरगांवच्या वरुण धनंजय जोशी यांचेशी संवाद…

कोपरगाव

दूरदृष्य प्रणालीचा सदुपयोग करत वरुन धनंजय जोशी पोहचला किरण बेदी यांच्या पुस्तक वाचन संवाद पर्वात…

सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचे सदिच्छा भेटीत वरुन जोशीचे संपर्क व संवाद कौशल्याचे कौतुक…

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोना संसर्ग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी लाॅकडाऊनचे निर्बंध असल्याने दीड वर्ष झाले शाळाही बंद आहेत…नोव्हेंबर २०१९ कोरोनाचा पहिला अध्यायाला सुरुवात झाली होती…सारं काही आलबेल असतांनाच सन २०२० वर्षांच्या सुरुवातीला भारतात कोरोणाने शिरकाव केला… दळणवळण सह सार्या व्यवस्थेवर निर्बंध आले…शाळाही बंद झाल्या…शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाला पुर्णवेळ गृहपाठावर व्यवस्था सुरू झाली… ऑनलाईन शिक्षणाचे पर्व सुरू झाले… शिक्षणासाठी चिमुकल्या हातांनी पाटी-पेन्सिल,वही-पेनाची जागा मोबाईल-टॅबने घेतली…शिक्षणाचे नवे पर्व पहावयास मिळाले…अशा परिस्थितीत कुठलेही संकट हे संकट नसून संधी आहे.असे समजून या संधीचे सोनं अनेक विद्यार्थ्यांनी केलं…असंच एक कोपरगांव शहरातील प्रेरणादायी उदाहरण म्हणजे वरुण धनंजय जोशी होय…

वरुण हा रेनबो इंटरनॅशनल स्कूल मध्ये ई.९ वी चा विद्यार्थी… वेगवेगळ्या विषयांची पुस्तके वाचण्याची आवड त्याला आहे…ईस्काॅनचे गौर गोपालदास यांचे लाईफस् अमेझिंग सिक्रेट (आयुष्याचे आच्छर्यकारक रहस्य) पहिल्यांदा इ.६वी असतांना म्हणजे वयाच्या १२ व्या वर्षी वाचले… तेव्हापासून वरुणला वाचनाची आवड निर्माण झाली…लाॅकडाऊन काळात मोबाईल वरुन वेगवेगळ्या क्षेत्रातील नामांकित व्यक्तींवर आधारित पुस्तके तो वाचू लागला…असेच एकदा युट्यूब वर पाॅडेचरी राज्याच्या राज्यपाल किरण बेदी यांनी मुलांमध्ये वाचनाची आणि ज्ञानाची आवड निर्माण व्हावी या हेतूने पुस्तक वाचन सत्र व संवाद अभियान सुरु केले असल्याचे समजले…

या सत्रात किरण बेदी प्रत्यक्ष सहभागी होवून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी जगभरातील विद्यार्थ्यांची वयोगटानुसार निवड केली…१० ते १३ वयोगटातून सात मुलांची निवड झाली…त्यात कोपरगावचा वरुण जोशी निवडला गेला…त्याने दि.१३ नोव्हेंबर २०२१ रोजी सात मुलांसोबत पाॅडेचरी राज्याच्या राज्यपाल किरण बेदी यांचेशी एक तास दीपावली स्पेशल सत्रात बोलण्याची संवाद साधला…किरण बेदी सोबत ओळख झाल्यावर किरण बेदी यांच्या जिवनावर आधारित “मेकिंग ऑफ द टाॅप काॅफ” पुस्तक वाचून बेदींनी आयुष्याच्या जडण घडण बद्दल सांगितले.तसेच या संवादत भारताचा वेगवान धावपटू मिल्खा सिंग यांचे जीवनचरित्र उलगडण्याचा प्रयत्न त्यांनी केला… काही वेळाच्या संवादातून मुलांना त्यांनी प्रश्न विचारण्यास प्रवृत्त केले…यात वरुणने व्यक्तीगत संवादात,आपण शिकलेली गोष्ट दूसर्यांनाही शिकवतो तेव्हा आपण अधिक चांगल्या पद्धतीने शिकलेली असते.तर आपण ती कोणासोबत सांगतात आणि अंगिकारतात…यावर श्रीमती बेदी म्हणाल्या, शिकलेली नवीन गोष्ट ही सहकारी यांना सांगते.शिकलेली गोष्ट लिहून ठेवते…पुढील काळात प्रसंगानुसार त्याचा कसा उपयोग करता येईल.याचा विचार करत असल्याचे सांगितले…अशा अनेक विषयांवर त्यांचा मुक्त संवाद साधला.

त्यानंतर दि.२५ डिसेंबर २०२१,दि.२६ मे २०२१ रोजी दूरदृष्यप्रणालीचा वापर करत संवाद व चर्चा झाली…नुकताच दि.९ जुन रोजी किरण बेदीचा वाढदिवस लक्षात ठेवून वरुणने बासरीवर वाढदिवसाची शुभेच्छा धुन वाजवली…त्यावर महामहीम किरण बेदी यांनी कौतुक करत त्याचे अभिनंदन केले.

किरण बेदी सोबत पुढील संवाद दि.१६ जुलै रोजी होत आहे.किरण बेदी यांच्या इंडिया व्हिजन फाउंडेशन या संस्थेच्या पुस्तक वाचन व संवाद पर्वाला त्या दिवशी एक वर्ष पुर्ण होत आहे.

चि.वरुण हा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी, प्रसिद्ध विधीज्ञ कै.आत्मारामदादा जोशी व श्रीमती पुष्पाताई जोशी यांचा नातू असून प्रगतशील शेतकरी व गोसेवक श्री.धनंजय जोशी व गृहिणी सौ.दिपश्री धनंजय जोशी यांचा मुलगा आहे…तसेच कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड.जयंतजी जोशी व अॅड.सौ.स्मीताताई जोशी तसेच बांधकाम व्यावसायिक श्री.मकरंदजी जोशी व गृहिणी सौ.मितालीताई जोशी यांचा पुतण्या आहे…वरुणचा त्याचा मोठा बंधू चि.समिरण हा साॅफ्टवेअर इंजिनिअर असून बेंगलोर येथील ए.एम.डी.या कंपनीत अभियंता आहे.

चि.वरुण आणि त्यांचे मित्र वृक्ष व निसर्ग प्रेमी आहे.त्यांनी या वयातच नेचर लव्हर्ड क्लबची स्थापना केली आहे. या क्लबच्या मुलांना प्रा.रोहिणी वक्ते यांचे मार्गदर्शन लाभले आहे…या मध्ये कु.मनस्वी विजय नरोडे कु.प्राची मकरंद जोशी,चि.पुष्कर संजय उदावंत,चि.पृथ्वीराज संजय पवार,चि.स्पंदन राहुल अमृतकर,चि.परम विनोद दगडे,चि.वीर निरज काले,चि.यश निलेश गंगवाल यांचे अनेक मित्रांनी एकत्र येऊन दोन वर्षांपासून पर्यावरणाचे काम करतात. त्यांना निसर्ग प्रेमी व माझी वसूंधरा अभियानचे दूत सुभाजित मुखर्जी यांनीही त्यांचे कामाचे कौतुक केले आहे…

चि.वरुण आणि त्यांचे सहकारी यांनी ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून दिग्गजांशी साधलेला संवाद आणि सहकारी मित्रांसोबत करत असलेले पर्यावरण कार्य कौतुकास्पद आहे…त्याचेशी संवाद साधतांना अतिशय साधेपणाने आणि आवडीने तो या सर्व गोष्टिंवर भरभरून बोलतो…चि.वरुण व त्यांचे सहकारी यांना भावी वाटचालीस सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *