
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील नागरिकांमध्ये मागील काही दिवसांपासून सायकल प्रेम वाढले असून या ग्रुपच्या माध्यमातून पर्यटना बरोबरच पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम राबवले जात आहेत अशी माहिती अँड.नितीन पोळ यांनी दिली
या बाबत बोलताना पोळ यांनी सांगितले की मागील एक ते दीड वर्षांपासून करोना साथीच्या आजाराने लॉक डाऊन जाहीर करण्यात आले त्या मुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले, घरात बसून राहण्याशिवाय पर्याय उरला नाही मात्र घरात बसण्यापेक्षा कोपरगाव शहरातील अनेक तरुणांचा सायकल चालवण्याकडे ओढा निर्माण झाला त्यातून अनेक तरुण एकत्र येऊन कोपरगाव सायकालिस्ट गृप निर्माण झाला या ग्रुपच्या माध्यमातून कोपरगाव परिसर व आजूबाजूच्या गावातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना भेटी देण्याचा उपक्रम राबविण्यात येऊ लागला मात्र नुसती आरोग्याची काळजी म्हणून सायकल चालवीत असताना या ग्रुपच्या माध्यमातून आता अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात असून पावसाळा सुरू झाल्या पासून विविध स्थळांना भेटी देत असताना या ग्रुपच्या माध्यमातून पर्यटन पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम राबवित असून आज या उपक्रमातून कोपरगाव ते अंकाई सुमारे ७० किलो मीटर सायकलवर जाऊन या ठिकाणी लिंब,बकान, जांभूळ, चिल्लर आदी झाडांच्या बिया नेऊन झुडपात टाकण्यात आल्या असून हा उपक्रम निश्चित पणे प्रेरणादायी असून प्रत्येक पर्यटकाने पर्यटन करताना सोबत विविध झाडांच्या बिया नेऊन त्या झुडपात टाकल्या तर पर्यटन स्थळांचे निसर्ग सौंदर्य संरक्षण करण्यास मदत होईल बेसुमार वृक्ष तोड करून पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना कोणी तरी पुढे येऊन पर्यावरण संरक्षण करण्यासाठी काम करत आहेत हे खूप महत्वाचे असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे
या उपक्रमात विनीत वाडेकर ,संजय पोटे , मनोहर कृष्णानी ,राजेंद्र खैरे,सनी वाघ,बापू वढणे, रवी चौधरी , रावसाहेब साळुंके , अमित पराई ,प्रवीण पगारे , मनोज नरोडे, अमित आगलावे अँड.नितीन पोळ आदी सहभागी झाले होते.
