
कोपरगाव प्रतिनिधी:- शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने वारी साकरवाडी परिसरात अहोरात्र आरोग्य सेवा पुरविणारे डॉक्टर ,परिचारिका,आरोग्य कर्मचारी ,पॅथॉलॉजी लॅब ,मेडिकल स्टोअर चालक ,आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी अशा सर्वच आरोग्य सेवकांचा सन्मान सोहळा संपन्न झाला त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात बोलतांना जिल्हाप्रमुख राजेन्द्र झावरे यांनी वारी परिसरात कार्यरत असणारे सर्वच आरोग्य सेवकांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केलेल्या विशेष कार्याबद्दल धन्यवाद देत गोदावरी बायोरिफायणरीजचे वैद्यकीय अधिकारी डॉ डी एम दरंदले यांचे कार्य अभिमानास्पद असल्याचे सांगत विशेष कौतुक केले
तालुकाप्रमुख शिवाजीराजे ठाकरे यांनी बोलतांना माननीय मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्य कोरोना मुक्तीसाठी अहोरात्र झटत देशात अव्वल दर्जाचे काम करून दाखवले असे सांगत मुख्यमंत्री व त्याना साथ देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले


यावेळी परिसरातील सर्वच आरोग्य कर्मचाऱ्याना शाल पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन त्यांच्या अनमोल कार्याप्रती शिवसेना वारी शाखेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली सामाजिक आंतर पाळत वर्धापनदिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष राजाभाऊ झावरे होते
याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य शिवसेनेचे तालुका सचिव श्री अशोकराव कानडे यांनी प्रास्तविक करुन स्वागत केले तर सूत्रसंचालन उपशाखाप्रमुख संभाजीराजे जाधव यांनी केले
यावेळी बोलतांना गोदावरी बायोरिफायणारीजचे वैद्यकीय अधिकारी डॉ डी एम दरंदले यांनी यापुढेही कोरोनाच्या नियमांचे पालन करत काळजी घेण्याचे आवाहन केले प्रा आ केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ पुजा बोर्डे यांनी सर्वांच्या सहकार्यामुळे दुसरी लाट रोखण्यात यश आल्याचे सांगत लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले

शहरप्रमुख कलविंदर दडीयाल यांनी शिवसेनेचे सुत्रच ८०%समाजकारण व २०% राजकारण असे असल्याने गावागावात शिवसैनिक कोरोनाच्या संकटात मदतीला धावतांना दिसले
यावेळी वारीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सतिशभाउ कानडे,माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव कानडे ,माजी उपसरपंच बाबासाहेब शिंदे,शेतकरी सेनेचे उपतालुका प्रमुख गोरख टेके ,तान्हाजीराव थोरमिशे ,राजेंद्र वाळुंज शाखाप्रमुख मधुकर टेके ,उपशाखाप्रमुख संभाजीराजे जाधव ,गणेश थोरात, मनोज वरकड,दिवाकर निळे, विशाखाताई निळे,तसेच वारी परिसरातील डॉ प्रकाश भांडगे ,डॉ सुजित तांबे, डॉ प्रमोद सुळे,डॉ सचिन दरेकर ,औषध निर्माता संजय पाखले,वर्षाव पाटील ,अमित काबरा ,राम कानडे, वसीम शेख, सचिन संत, गोरक्षनाथ चव्हाण, यश डोशी, अतुल पठाडे तसेच इतर नागरिक व आरोग्य कर्मचारी,परिचारिका आदी सह शिवसैनिक उपस्थित होते.
