नगराध्यक्ष तुमच्या भ्रष्टाचारी व किळसवाण्या प्रवृत्तीची आम्हालाच काय पण पुर्ण शहरालाच ॲलर्जी झाली आहे:-उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
सन 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत तुमचे डिपॉझीट जप्त झाले यातुनच हे सिद्ध झाले, यावरुन तुम्ही काही तरी बोध घ्याल असे वाटले होते परंतु तसे होतांना दिसत नाही. अशी टीका कोपरगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी केली आहे.
श्री निखाडे पुढे म्हणाले, मागील चार वर्षाचा नगराध्यक्षपदावरील तुमचा प्रवास म्हणजे “ मै ना खाऊंगा ना खाने दुंगा” या ऐवजी मै भी खाऊंगा और सबको खाने दुंगा असा झालेला आहे हे कोपरगांव शहरातील जनता बघत आहे.स्वत:ला भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत म्हणुन मिरवणाऱ्यांनी सन 2014 मध्ये कोपरगांव मतदार संघाच्या इतिहासात प्रथमच भाजपाच्या महिला आमदार निवडुन आल्या होत्या त्यांना शहर विकासासाठी कधीच सहकार्य केले नाही. व्यक्तीव्देशातुन आपण त्यांना कायमच विऱोधच केला आहे हे शहरवासीयांना माहित आहे. तरी सौ.कोल्हे ताईंनी शहर विकासाचे उदिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवुन कोपरगांव नगरपालिकेला कोट्यावधी रुपयांचा निधी शासनाकडुन मिळवुन दिला.त्या निधीमुळेच आज ही कोपरगांव शहरातील विकासांचे कामे चालु आहे.
2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या अधिकृत उमेदवाराला पराभव करण्यासाठी तुम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडुन आणण्याची सुपारी घेतली होती, यावरुनच तुमची पक्षनिष्ठा व प्रवृत्ती किती खालवलेली आहे हे त्या वेळेस दिसुन आले.गेल्या चार वर्षापासुन कोपरगांव शहराच्या विकासासाठी भाजपा-शिवसेना नगरसेवकांनी बहुमत असुनही तुम्हाला शहर विकासकामांसाठी कायमच साथ दिली आहे. विकास कामासाठीचे सर्व ठराव हे बहुमताने मंजुर करुन दिलेले आहे. जिथे गरज नसताना काही कामे आपण मंजुर करण्याचा प्रयत्न केला तसेच काही कामांचे अंदाजपत्रके हे वा़ढीव दिसत होते म्हणजेच त्याकामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा वास येत होता. अशाच काही कामांना आम्ही आक्षेप घेतला बाकीच्या सर्व विकासांच्या कामांना आम्ही कायम मंजुरीच दिलेली आहे. हे आपणास माहित असतानाही कोणाच्या तरी इशाऱ्यावरुन व कोणाला तरी बरे वाटावे म्हणुन आपण भाजपा-शिवसेना नगरसेवकांविरुद्ध कायमच गरळ ओकत असतात. तरी सुद्धा शहर विकासासाठी आम्ही या तुमच्या निच प्रवृत्तीकडे नेहमीच दुर्लक्ष केलेले आहे. आत्ताच झालेल्या स्थायीसमितीच्या सभेमध्ये भाजपा – सेना नगरसेवकांनी कुठलेही प्रकारचे राजकराण न आणता विकासांचे सर्व विषय बहुमताने मंजुर करुन दिलेली आहे. त्यामुळेच आपणाला व आमदारांना उद्घाटने करुन खोटी प्रसिद्धी मिळविण्याची संधी मिळाली आहे. नगरपालिकेच्या विकासकामांसाठीचा निधी आणण्यात आमदारांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही निधी नगरपालिकेचा, सभागृहात विषय बहुमताने भाजप – शिवसेना नगरसेवकांनी बहुमतांनी सर्व विषय मंजुर करुन दिले. असे असतांना ही या विकासकामांचे खोटे श्रेय घेण्याच्या आमदारांच्या प्रवृत्तीची आम्हाला ॲलर्जी आलेली आहे, विकासकामांची ॲलर्जी आलेली नाही.
काँक्रीटीकरणावर डांबरीकरण करण्याचा जगावेगळा प्रयोग तुमच्या नेतृत्वाखाली यशस्वी केला याबाबत कोपरगांव नगरपालिकेची महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. कोपरगांव शहरात काही रस्त्यांच्या निकृष्ट कामांबाबत व त्यात होणाऱ्या भ्रष्टचाराबाबत काही समाजसेवकांनी वेळोवेळी कोपरगांव नगरपालिकेकडे तक्रारी केलेल्या आहेत. परंतु आपण या तक्रांरीकडे जाणुन बुजुन दुर्लक्ष करीत आहात. संबंधित ठेकेदारांना व संबंधित अधिकाऱ्यांना का पाठीशी घालत आहात याचे गौडबंगाल सर्व शहरवासियांना माहित आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील भुयारी गटारीचे बांधकाम करण्यासाठी नगरपालिकेने 16 लाखाची तरतुद केली होती. भुयारी गटारीचे कामकाज सुरु असताना ते काम निकृष्ट दर्जाचे सुरु असल्यामुळे परिसरातील व्यापारी, नागरीकांनी नगराध्यक्ष म्हणुन आपणाला कळवुन देखील आपण व पालिका प्रशासनाने या तक्रारींकडे दुर्लक्ष केले.शेवटी व्हायचे तेच झाले गटारीचे काम पुर्ण झाल्यानंतर चार-आठ दिवसांतच गटारीच्या बांधकामाला तडे गेले म्हणजेच ते बांधकाम निकृष्ट दर्जाचे होते हे सिद्ध होते. समाजसेवकांच्या तक्रारींकडे आपण कायम दुर्लक्ष करता हे लक्षात आल्यानंतर व नगरपालिकेच्या कारभारात सहमती एक्सप्रेस असल्याच्या मजबुरीमुळे लोकप्रतिनिधींना स्वत: तक्रारदारांकडे जावुन समजुत काढण्याचे काम करावे लागत आहे, हि गोष्ट आपणांसाठी निश्तितच लाजीरवाणी आहे.
मागील वर्षापासुन कोपरगांव शहरात कोरोना संसर्गाची लाट आलेली आहे. कित्येक नागरीक कोरोना बाधित होवुन त्यांना हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट व्हावे लागले,कित्येक नागरीकांना आपला प्राण ही गमवावा लागला. या आजारपणाच्या उपचारामुळे कित्येक नागरीकांना प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे.म्हणुन गेल्या सात-आठ महिन्यापासुन आम्ही कोपरगांव नगरपालिकेकडे नागरीकांच्या दृष्टीकोनातुन महत्वाचा विषय असलेली एक अद्यावत रुग्णवाहिका, नागरीकांच्या आरोग्यासाठी सी.टी.स्कॅन मशिन नगरपालिकेने खरेदी करावे. येणाऱ्या संभाव्य तिसऱ्यालाटे साठी नागरीकांच्या आरोगाच्या दृष्टीने आधुनिक कोविड सेंटर सुरु करावे. अशा मागण्या आम्ही वेळोवेळी नगरपालिकेकडे करत आहोत. परंतु आपण या मागण्याकडे लक्ष न देता जिथे भ्रष्टाचार करता येईल अशाच कामांकडे लक्ष देवुन ते कामे करण्यात आपण मग्न आहात.भ्रष्टाचार करण्याचा नादात आपण हे विसरलात शासन निर्णय नुसार पावसाळ्यात रस्ता डांबरीकरणाची कामे करता येत नाही. कालच कोपरगांव शहरात दुपारी नगरपालिकेच्या वतीने विष्णु चित्रमंदीर (गोदामगल्ली) या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम केले व संध्याकाळी (31.05.2021) प्रंचड प्रमाणात पाउस पडला यामुळे पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले याला जबाबदार कोण ? असा प्रश्नही निखाडे यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *