
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव बेट भागातील न.पा.शिक्षण मंडळ शाळा क्रं. ५ (दक्षिण मुखी हनुमान मंदिर ट्रस्ट जागेतील) इ.१ली व २ री वर्गाचे पत्रे जोरदार वार्याने उडून लगतच्या मारुती मंदिर कळसा जवळ पडल्याची घटना दुपारी ३:३० घडली.


सदर घटनेची प्रथम माहिती स्थानिक नागरिक श्री.भाऊसाहेब शिंदे यांना तेथे खेळणार्या लहान मुलांकडून सांगताच त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक विलास माळी, आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके यांना कळवली.तेथे तातडीने आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके पोहचले.त्यांनी फेब्रिकेटर सोबत शाळेच्या छतावर जावून पहाणी केली.

मंदिराच्या कळसालगत अडकलेले पत्रे संभव्य धोकेदायक होवू शकतात.या करिता पाईपाच्या साट्यात अडकलेले पत्रे तातडीने हटविण्यासाठी स्थानिक नागरिक यांचे मदतीने कटिंग मशीनने वेगळे करण्यास सुरुवात केली आहे.
प्रशासनाचे वतीने तहसिलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेला पंचनामा व मदतकार्य बाबत कळवले आहे.
दरम्यान घटना स्थळी तलाठी योगेश तांगडे,शाळेचे मुख्याध्यापक विलास माळी, नगरसेवक अनिल आव्हाड, आरोग्य निरीक्षक सुनील आरणे,संजय रोडे,दादासाहेब आव्हाड,गोदामाई प्रतिष्ठाणचे आदिनाथ ढाकणे,दिपक शिंदे, दादासाहेब नाईकवाडे, शिक्षक सुनील रहाणे,न.पा.शिक्षण मंडळाचे प्रशांत शिंदे,राजेंद्र परदेशी यांचे सह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
स्थानिकांचे मदतीने हनुमान मंदिराचे कळसालगत अडकलेले पत्रे हटविण्याचे काम सुरू आहे.
