Uncategorized

“लोकनेते भिमराव नाना बडदे यांचे प्रेरणादायी विचार स्मारक व्हावे”:- संत रमेशगिरीजी महाराज…

लोकनेते नाना बडदे यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त कोपरगावात वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ…
कोपरगाव प्रतिनिधी
“गोरगरीब, दीनदुबळ्यांचा नेता व शेतकऱ्यांचे कैवारी असलेल्या नाना बडदे यांनी पुणे व कोपरगांवसाठी सर्वाधिक वेळ जनसामान्यांसाठी दिला. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन त्यांचे प्रेरणादायी स्मारक कोपरगावात व्हावे.” असे आवाहन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती संत रमेशगिरीजी महाराज यांनी केले आहे.

धर्मयोद्धा माजी खासदार अॅड. स्व. भिमराव (नाना) बडदे स्मृती प्रतिष्ठान, महाराष्ट्र प्रांत, शाखा कोपरगाव व जयंती सप्ताह समिती २०२६ यांच्या वतीने लोकनेते, माजी खासदार स्व. भिमराव नाना बडदे यांची ७९ वी जयंती स्वातंत्र्यवीर वि. दा सावरकर चौक कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात स्व. नाना बडदे यांच्या प्रतिमेचे पूजन व ५०० विविध स्वदेशी झाडांचे वितरण करून “वृक्षारोपण आणि पालकत्व अभियान २०२६” ला शुभारंभ करण्यात आला.या कार्यक्रमास श्री क्षेत्र राघवेश्वर देवस्थानचे महंत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज, आमदार विवेक कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान, पतसंस्था फेडरेशनचे कार्यकारी अध्यक्ष काका कोयटे, जेष्ठ नागरिक सेवा मंचचे विजय बंब, शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित दिलीप घोडके, मराठा पंचाचे अध्यक्ष अॅड. संजय भोकरे,बाळासाहेब नरोडे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र गिरमे, रयत शिक्षण संस्थेचे संदीप वर्पे, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, गटनेते प्रसाद आढाव, मंदार पहाडे, बाळासाहेब बडदे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, दिलीप दारुणकर यांच्यासह शिर्डी,येवला परिसरासह स्थानिक नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष रामदास (अण्णा) खैरे यांनी कोपरगाव नगरपरिषदेला नानांच्या स्मारक आणि ईमारत नामकरण बाबत निवेदन सादर केले. उपस्थितांनी नानांच्या कार्याला उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली.स्वागत सागर बडदे यांनी, प्रास्ताविक अॅड. जयंत जोशी यांनी तर आभार अभियान प्रमुख सुशांत घोडके यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धर्मयोद्धा माजी खासदार अॅड. स्व. भिमराव (नाना) बडदे स्मृती प्रतिष्ठान, महाराष्ट्र प्रांत, शाखा कोपरगाव व जयंती सप्ताह समिती २०२६ सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *