कोपरगावात राष्ट्रीय सामाईक प्रवास कार्ड नोंदणी शिबिर;आ.विवेकभैय्या कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून नागरिकांना विविध प्रवास सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहन

कोपरगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध प्रवास सवलत योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने राष्ट्रीय सामाईक प्रवास कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबिर आ.विवेकभैय्या कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयात, गुरुद्वारारोड, कोपरगाव येथे दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार असल्याची माहिती आ.विवेकभैय्या कोल्हे जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या उपक्रमाला उदंड प्रतिसाद नागरिकांचा मिळतो आहे.
राष्ट्रीय सामाईक प्रवास कार्डद्वारे राज्य परिवहन महामंडळाच्या बस, मेट्रो तसेच इतर सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी एकाच कार्डाचा वापर करता येणार असून, शासनाच्या विविध प्रवास सवलत योजनांचा लाभही मिळणार आहे. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के मोफत प्रवास, ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत, सर्व वयोगटातील महिलांना महिला सन्मान योजनेअंतर्गत ५० टक्के प्रवास सवलत, बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत प्रवास पास, विद्यार्थ्यांना तसेच दिव्यांग आणि सैनिकांना शासनाच्या नियमानुसार प्रवास सवलती उपलब्ध आहेत.
शिबिरासाठी आधार कार्ड व त्यास जोडलेला मोबाईल क्रमांक सोबत आणणे आवश्यक असून, दिव्यांग लाभार्थ्यांनी विशिष्ट दिव्यांग ओळखपत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच कार्डमध्ये किमान १०० रुपये शिल्लक ठेवणे बंधनकारक आहे.पात्र लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेऊन राष्ट्रीय सामाईक प्रवास कार्ड तयार करून शासनाच्या विविध प्रवास सवलत योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ.विवेकभैय्या कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
