भाजपचा युवा चेहरा पुढे : विवेकभैय्या कोल्हे यांचा विधानपरिषद अर्ज दाखल..

Uncategorized

मोठ्या जल्लोषात विवेकभैय्या कोल्हे यांचा विधानपरिषद उमेदवारी अर्ज दाखल..

विवेकभैय्या कोल्हे यांचा आवाज विधान परिषदेमध्ये गाजणार भाजपा समर्थकांनी केला मुंबई, अहिल्यानगर, नाशिक, संभाजीनगर, नंदुरबारसह विविध ठिकाणी जल्लोष…
कोपरगाव प्रतिनिधी:-
भाजपाकडून विधानपरिषदेसाठी युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली असून या पार्श्वभूमीवर विधानभवनात त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी उस्फूर्तपणे उपस्थित राहिलेल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या जोशपूर्ण घोषणांमुळे विधानभवन परिसर दुमदुमून गेला होता.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावी नेतृत्वात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री जयप्रकाश गोरे, मंत्री आशिष शेलार, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे तसेच मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली विवेकभैय्या कोल्हे यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल केला.
अर्ज दाखल केल्यानंतर कोपरगावसह नगर नाशिक नंदुरबार जळगाव धुळे यासह असंख्य ठिकाणी कोल्हे समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. कार्यकर्त्यांनी विवेकभैय्या कोल्हे यांना खांद्यावर उचलून घोषणाबाजी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांनी कोल्हे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने समर्थक मंत्रालयात उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचा विजय असो,धन्यवाद धन्यवाद देवाभाऊ धन्यवाद,महाराष्ट्राचा लाडका भाऊ देवाभाऊ देवाभाऊ,विवेकभैय्या तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है आणि भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.

भाजप नेतृत्वाने विवेकभैय्या कोल्हे यांना विधान परिषदेत संधी देत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. सहकार,सामाजिक, युवा सक्षमीकरण क्षेत्रात कमी वयात नावलौकिक मिळवलेल्या, अभ्यासू आणि तडफदार नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या विवेक कोल्हे यांना या संधीमुळे जनसेवा अधिक व्यापक करण्याची संधी मिळणार आहे. या निर्णयाचे राज्याच्या विविध भागातून स्वागत होत असून, या नेतृत्वाच्या माध्यमांतून प्रश्न मांडून विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सरकारचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी पक्षाचा एक सैनिक म्हणून सर्वसामान्यांसाठी अहोरात्र काम करण्याचा आमचा मानस आहे. सहकारातून समृद्धी आपण म्हणतो ग्रामीण अर्थव्यवस्था ही सहकारावर अवलंबून असून ज्या ज्या ठिकाणी सहकार फुललेला आहे तेथील शेतकऱ्यांचा दरडोही उत्पन्न अधिक आहे.सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाच्या माध्यमातून ज्या योजना असतील तसेच पक्षाच्या माध्यमातून सूचना असतील त्या आम्ही ग्रामीण भागात अंमलबजावणी करून ग्रामीण अर्थकारणाला सक्षम करण्याचे काम करणार आहोत. सहकार युवा सशक्तिकरण, संघटना हितासाठी आवश्यक तेथे पक्षाने दिलेल्या जबाबदारी प्रमाणे काम करणार असल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *