

कोपरगाव प्रतिनिधी:-
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उत्तर नगर जिल्हा युवक उपाध्यक्षपदी भावेश थोरात तसेच कोपरगाव युवक शहराध्यक्षपदी स्वप्निल पवार यांची नियुक्ती करण्यात आली.


नगरचे युवक जिल्हाध्यक्ष अमितजी भांगरे यांचे त्यासंदर्भातले पत्र प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख,आमदार सुनीलजी भुसारा तसेच पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व जिल्हा कार्याध्यक्ष संदीपजी वर्पे यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी गव्हाणे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव राकेशजी कोते, नाशिक शहर जिल्हाध्यक्ष गजाननजी शेलार आदी उपस्थित होते.
