
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगावातील पाच नंबर तलाव योजनेचा सुरुवातीपासूनच मोठा गाजावाजा करण्यात आला. आमदारांकडून या योजनेच्या जाहिरातींवर लाखो-कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले, परंतु प्रत्यक्षात कोपरगावकरांना त्याचा कोणताही ठोस फायदा झालेला नाही. शहरातील नागरिकांना आजही दररोज पाणी मिळत नसून, पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ठेकेदाराला पाठिंबा देत इतर तलावाचे खोलीकरण अद्याप अपूर्ण आहे. सध्या पाच नंबर तलावातून थेट शहराला पाणी येतं नाही योजनेत अपूर्ततता आहे.बिले अदा झाले आहे.चार वर्षे नगरपरिषद प्रशासकांच्या ताब्यात असताना प्रत्यक्ष कारभार कोणाच्या इशाऱ्यावर चालत होता, हे जनतेला चांगलेच माहिती आहे.विरोधकांनी खोट्या आणि भुलव्या घोषणा करून जनतेची दिशाभूल केली आणि वेळ मारून नेली त्यामुळे सत्यापासून तोंड लपवत विरोधक पळाले, असा आरोप माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनावणे यांनी केला.
अक्षय तृतीयेच्या दिवशी श्री स्वामी समर्थ केंद्रात घडलेल्या घटनेवरही त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. धार्मिक आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या कार्यक्रमात काळे गटाच्या नगरसेवकांनी भूमिपूजनाच्या मुद्द्यावरून आ.का च्या फोननंतर वाद निर्माण करत कार्यक्रमात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला व वैयक्तिक जमीन वादाचे बेगडी भांडवल करत धार्मिक सभामंडपाला अप्रत्यक्ष विरोध केला.भूमिपूजनावेळी दोन्ही गटांच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन सहभाग घेतला, मात्र विश्वासात न घेतल्याचा आरोप धादांत उघडा पडला आहे. उलट शहर विकासापासून पळ काढण्याचे काम काळे गटाने केले आहे.
सोनवणे यांनी सांगितले की, नगरपालिकेचा कार्यभार स्वीकारून तीन महिने पूर्ण झाले असून, या काळात पारदर्शक कारभार करण्यावर भर देण्यात आला आहे. गेल्या चार वर्षांतील प्रशासकीय काळातील आमदार काळे सत्ताधारी असतानाच्या निकृष्ट कामकाजाचा सविस्तर आढावा नागरिकांसमोर मांडण्यात आला.

विविध प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ५७ कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले, तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला मात्र नगरपरिषदेकडून सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही सार्वजनिक बांधकामकडे वळविण्यात आला कारण स्वतःच्या बगलबच्चांना फायदा देणे विरोधकांना शक्य नव्हते कारण सध्याची नगरपालिका पारदर्शक कारभारावर भर देणारी आहे असे प्रसाद आढाव यांनी सांगितले.वित्त व नियोजन विभागाकडून ५७ कोटी रुपये आणि वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून १० कोटी रुपये नगरपरिषदेला मिळाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निधी विकासासाठी दिला होता, मात्र विरोधकांनी तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळवला. नगरपालिकेकडे स्वतःची सक्षम यंत्रणा आणि अभियंते असताना हा निर्णय का घेण्यात आला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला यासाठी नागरिकांच्या करातील मोठी रक्कम हा निधी उपलब्धतेच्या प्रक्रियेसाठी खर्च झाली आहे मात्र जाणीवपूर्वक ती वळवण्याचा दुर्दैवी प्रकार आ. काळे यांनी केला आहे असा अप्रत्यक्ष आरोप केला आहे.
योगेश बागुल यांनी शहरातील पाणी प्रश्नाची समस्या मिटवण्यापेक्षा विरोधकांनी ती कायमस्वरूपी वाढलेली कशी राहील अशी कामे केली आहे. अर्धवट योजना असताना उद्घाटनाचा गाजावाजा केला दुर्दैवाने त्यातून पाण्याची तहान नागरिकांची भागली नाही हे वास्तव आहे. चांगल्या कामांना विरोध करणे ही काळेगटाची नीती असून आजवर त्यांनी शहर विकासासाठी हजारो कोटींच्या निधीच्या केलेल्या गप्पातून काहीही साध्य झाले नाही उलट गेल्या तीन महिन्यात नवीन पदाधिकाऱ्यांनी सत्य आल्यानंतर पालिकेत भरीव काम सुरू झाले आहे हे नागरिकांना दिसते आहे.
विनोद राक्षे यांनी नगरपालिकेच्या कामकाजात पारदर्शकता वाढवण्यावर भर आहे. नगराध्यक्ष पराग संधान पूर्णवेळ नगरपालिकेत उपस्थित राहून कारभार पाहत आहेत. या उलट विरोधकांनी भोंदू खरात प्रमाणे आपल्या संशयास्पद भूमिका पडताळण्याची गरज आहे. इतरांना गुंडमवाली म्हणत आहे मात्र ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले जनमान्य प्रतिनिधी आहेत याउलट आरोप करणाऱ्यांना त्यांच्या पक्षाने साधे तिकीट सुद्धा दिले नाही याचा अंतर्मुख होऊन त्यांनी विचार करावा. ज्यांचा सगळा कारभार शासनाने गुन्हा दाखल करून शिक्षा भोगलेला गुन्हेगार सांभाळत असेल त्यांनी आमच्यावर बोलण्याची हिंमत करू नये कारण गोळीबार रेशन माफिया अवैध धंदे यांचे मोठे आका तुमच्याकडेच आहे असा सज्ज इशारा राक्षे यांनी विरोधकांना दिला आहे. यासह भोंदू खरात कुणाच्या तीन दिवस घरात पूजा करत होता अशी सर्वत्र चर्चा आहे त्यावर अधिक खोलवर जाऊन अभ्यास केल्यास तिथे तीर्थ घेणारे कोण कोण होते हे शोधण्याची गरज आहे. खरात भक्ताचे पाय धुणाऱ्यांनी आम्हाला अध्यात्माचे ज्ञान शिकू नये अन्यथा तुमचेच पितळ उघडे पडेल असा सूचक इशाराही राक्षे यांनी दिला आहे.
आगामी काळात नगरपालिकेच्या नवीन इमारतीत पत्रकारांसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देण्यात येणार असून, सर्वसाधारण सभांचे लाईव्ह प्रक्षेपण करून प्रशासन अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे असे विचाराधीन असल्याचे गटनेते प्रसाद आढाव यांनी सांगितले.
संदीप देवकर यांनी पाच नंबर तलाव प्रकल्पातील त्रुटींवर सविस्तर भाष्य केले. तलावाची हायड्रोलिक चाचणी न करता ठेकेदाराला पूर्ण बिल अदा करण्यात आले, तसेच ९२ किलोमीटर पाईपलाईन नेमकी कुठे टाकली याबाबत स्पष्टता नाही. शहरात अनेक पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या, मात्र त्या मुख्य लाईनला जोडल्या नसल्यामुळे नागरिकांना त्याचा फायदा होत नाही. नागरिकांकडून तक्रारी वाढल्यानंतर काही टाक्या कार्यान्वित करण्यात आल्या, असे त्यांनी नमूद केले.
अनिल आव्हाड यांनी विरोधकांची खोटी बतावणी उघड करत वैयक्तिक कुणाच्या जागेचा प्रश्न आणि शहर विकासाच्या सर्वसाधारण सभेचा काही संबंध नाही असा जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांना सत्याचा सामना करण्याची हिंमत नसल्याने व पारदर्शक कारभाराला त्यांना भीती वाटू लागत असल्याने जाणीवपूर्वक पळ काढण्याचे काम त्यांनी केले आहे.
संतोष गंगवाल यांनीही विरोधकांवर टीका करताना श्वेतपत्रिकेच्या भीतीने बहिष्कार टाकल्याचा आरोप केला. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे अनेक मुद्दे सभेत मांडण्यात आले असून, त्यावर विरोधकांनी कोणताही प्रतिवाद केला नाही. श्वेतपत्रिका जाहीर झाल्यास अनेक गैरप्रकार उघडकीस येतील, असा इशारा देत त्यांनी पारदर्शकतेची मागणी केली.
या पार्श्वभूमीवर कोल्हे गटाने प्रकार परिषदेचे आयोजन केले होते.यावेळी उपनगराध्यक्ष,सर्व सभापती,नगरसेवक, गटनेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
