उन्हाळी हंगामाच्या पाणी मागणी अर्ज भरण्याची मुदत वाढवून थकीत पाणीपट्टी भरण्याची अट शिथिल करा :- आमदार आशुतोष काळे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांना सात नंबर पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपली असून अनेक शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज न भरल्यामुळे हे लाभधारक शेतकरी वंचित राहणार आहे त्यासाठी पाणी मागणी भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत.
उन्हाळी हंगाम २०२६ साठी गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी सात नंबर पाणी मागणी अर्ज भरण्याची मुदत २७ मार्च देण्यात आली होती. परंतु अनेक शेतकऱ्यांना दिलेल्या मुदतीच्या आत आपले पाणी मागणी अर्ज भरता आलेले नाही. उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत असून उभ्या पिकांना तसेच चारा पिकांना व फळबागांना पाण्याची गरज भासणार आहे. मात्र सात नंबर पाणी मागणी अर्ज न भरल्यामुळे लाभक्षेत्रातील कित्येक शेतकरी मिळणाऱ्या सिंचनाच्या आवर्तनापासून वंचित राहून त्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामासाठी सोडण्यात येणाऱ्या सिंचनाच्या आवर्तनाची मुदत २० एप्रिल पर्यंत वाढवून द्यावी अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी केल्या आहेत.
तसेच सोडण्यात येणाऱ्या आवर्तनातून सिंचनासाठी सात नंबर पाणी मागणी अर्ज भरतांना थकीत पाणीपट्टी भरण्याची अट टाकण्यात आली असून शेतकऱ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेवून हि अट तात्पुरती शिथिल करण्यात यावी. जेणेकरून अधिकाधिक शेतकरी सात नंबर पाणी मागणी अर्ज भरू शकतील आणि त्यामुळे उन्हाळी हंगामातील पाणी व्यवस्थापन देखील सुलभ होईल.त्यासाठी थकीत पाणीपट्टी भरण्याची अट तात्पुरती शिथिल करून गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *