
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव नगरपरिषदेच्या वित्तीय वर्ष २०२६-२७ अंदाजपत्रकास मंजुरी देण्याचा एकच विषयासाठी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.पालिकेकडून अतिशय महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याबद्दल सकारात्मक चर्चा होऊन सभा पार पडली.स्वच्छतेच्या बाबतीत काम होते आहे मात्र अधिकच्या दर्जेदार सुधारणा पुढील महिन्यात दिसू लागतील तसेच ढापे दुरुस्ती,किरकोळ कामे आणि मुख्यत्वेकरून काही रस्त्यांचा कामाला सुरुवात करण्यापूर्वी पाईपलाईनचे काम पूर्ण करून घेण्यावर भर आहे कारण रस्ते झाल्यानंतर पुन्हा नवीन रस्ते खोदून पाइपलाइन केल्यास नुकसान जनतेच्या पैशाचे होते व कामेही खराब होतात त्यामुळे काही काळात हा प्रश्न सोडवला जाईल अशी भूमिका नगराध्यक्ष पराग संधान यांनी मांडली आहे.
पाण्याच्या बाबतीत तीस ते चाळीस टक्के कामकाज पूर्ण केले त्यातच स्वच्छ पाणी शहराला येऊ लागले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी स्नेहलताताई कोल्हे, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्यासमवेत भेट घेतली व चर्चा केली होती त्यानुसार येत्या काही दिवसात शंभर टक्के शास्ती माफीचा निर्णय होणार आहे.
जनतेला अपेक्षित कामे पालिकेचे आर्थिक स्थिती सांभाळून पूर्ण करण्यावर भर असून मागील काही सुधारणा करण्यात अधिकचा वेळ द्यावा लागतो आहे.पत्रकार बांधवांना प्रवेश न देण्याचा कुठलाही विचार नसून जे निर्णय सर्वसाधारण सभेमध्ये होतात ते जनतेसमोर आम्ही मांडत असतोच मात्र सध्या नगरपरिषदेत पत्रकार व्यवस्था होण्यासाठी जागेची कमतरता आहे आणि सर्वच पत्रकारांना जागा उपलब्ध करून देणे शक्य नसल्याने दुजाभावाची भावना होऊ नये यासाठी आम्ही जी चर्चा आणि निर्णय होतात ते मांडण्याच्या दृष्टीने सकारात्मक असतो.नवीन इमारतीत स्थलांतर झाल्यानंतर सर्वच पत्रकारांना आसन व्यवस्था उपलब्ध होणे शक्य होणार आहे ते पर्यंत सहकार्य अपेक्षित आहे अशी स्पष्ट भूमिका नगराध्यक्ष पराग संधान यांनी मांडली आहे.
विश्वासनामा पूर्ण करण्याच्या दृष्टीने आमचे कामकाज सुरू असून पालिकेच्या मालकीची स्वतःची रुग्णवाहिका लवकरच घेतो आहोत जी नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने मोलाची ठरणार आहे.कुंभमेळ्याच्या धर्तीवर गोदावरी तट सुशोभीकरण, रिटेनिंग वॉल अशी अनेक कामे होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी केलेली आहे.यावेळी उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर,सर्व नगरसेवक,पालिका अधिकारी उपस्थित होते.
चौकट:
महिला भगिनींच्या दृष्टीने सार्वजनिक स्वच्छता गृहांचा प्रश्न महत्वाचा असून तो प्राधान्याने सोडविण्यावर भर देतो असून त्यादृष्टीने काम करणार आहोत.यासह आमच्या विश्वासनाम्यात दिलेले आश्वासने पूर्ण करण्यासाठी आमचे काम सुरू असून सगळेच विषय एकत्र न घेता त्यासाठी टप्प्याटप्प्याने तरतूद आणि निर्णयासाठी अनुकूल स्थिती पाहून कार्यवाही करणार असल्याचे नगराध्यक्ष म्हणाले.
