ए आय सी टी ई मान्यता प्राप्त ऑटोनॉमस दर्जा प्राप्त संजीवनी महाराष्ट्रात विनाअनुदानित वर्गवारीतील पहिले पॉलिटेक्निक…
कोेपरगाव प्रतिनिधी :- संजीवनी के. बी. पी. पॉलिटेक्निकच्या पहिल्या ऑटोनॉमस बॅचचा निकाल उत्कृष्ट लागला. त्यात कॉम्प्युटर टेकनॉलॉजी व इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगच्या कीर्ती सोमनाथ शिंदे व वर्षा दादासाहेब भुजाडे यांनी ९६. ७१ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण झाल्या. अशी माहीती संस्थेच्या वतीने देण्यात आली.
या पॉलीटेक्नीकने महाराष्ट्रात सर्वात प्रथम अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (ए.आय.सी.टी.ई), नवी दिल्ली यांचेकडून विनाअनुदानित वर्गवारीत ऑटोनॉमस दर्जा प्राप्त केला आहे. उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता, अद्ययावत अभ्यासक्रम आणि परिणामकारक मूल्यमापन पद्धतीच्या जोरावर तांत्रिक शैक्षणिक क्षेत्रात नवा मानदंड प्रस्थापित केला आहे.
यंदाप्रथम वर्ष प्रथम सत्र कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या साक्षी संतोश शिंदे हीने ९६. ५७ टक्के गुण मिळवुन दुसरा व समिक्षा दत्तु शिंदे हीने ९५ टक्के गुण मिळवुन तिसरा क्रमांक पटकावला. इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या समर्थ बाळासाहेब मुळे याने ९४. ८६ टक्के गुण मिळवुन या विभागात दुसरा तर ज्ञानेश्वरी राहुल जाधव हिने ९३ टक्के गुण मिळवुन तिसरा क्रमांक मिळविला. मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या शालिनी मधुकर कडू हिने ९३. ८६ टक्के, साहिल रामदास वाणी याने ९२. ५७7 टक्के व आकांक्षा नवनाथ पळसकर हिने ९२. ४३ टक्के गुण मिळवुन अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. मेकॅट्रॉनिक्स विभागात देविका संतोष घोंगणे हिने ९३. ५७ टक्के गुण मिळवुन प्रथम वर्ष प्रथम सत्रात पहिल्या क्रमांक पटकावला. शालुकुमारी भुतकुनकुमार शाह हीने ९३. ४३ टक्के व समिक्षा शिवाजी शेळके हीने ९३ टक्के गुण मिळवुन अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. सिव्हिल इंजिनिअरींग प्रथम वर्ष प्रथम सत्रात आदिती मच्छिंद्र वल्टे हिने ९१. ४३ टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांक मिळविला. हर्षदा काशिनाथ नवले हिने ९०. ८६ व प्रांजली महेश चिने हिने ८६. ७१ टक्के गुण मिळवुन या विभागात अनुक्रमे दुसरा व तिसऱ्या क्रमांक मिळवीला.
संस्थेचे अध्यक्ष नितिनकोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे हे गुणवंत विद्यार्थी, प्राचार्य ए. आर. मिरीकर यांचे अभिनंदन केले.यावेळी परीक्षा विभाग प्रमुख डॉ. गणेश जोर्वेकर, अकॅडमिक डीन डॉ. एस. एम. सोनवणे, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी विभाग प्रमुख प्रा. संदीप पाटील, रजिस्ट्रार श्री नानासाहेब कोल्हे आदि उपस्थित होते.
चौकट :
संजीवनी के. बी. पी. पॉलिटेक्निकने मागील तब्बल ४३ वर्षांच्या कालखंडात देशपातळीवर किर्तीमान प्रस्थापित केले. तांत्रिक शिक्षणाला नवी दिशा दिली. उद्योगाभिमुख व गुणवत्तापूर्ण शिक्षण ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावे या उद्देशाने संस्थेने चालू शैक्षणिक वर्षापासून ऑटोनॉमस दर्जा प्राप्त करून शैक्षणिक स्वायत्ततेचा नवा अध्याय सुरू केला आहे. इतर पॉलिटेक्निकला तंत्र शिक्षणालय व राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून स्वायत्तता दिली जात असताना, संजीवनी पॉलिटेक्निकने मात्र महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षणालय व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्यासह व्यावसायिक शिक्षणावर राष्ट्रीय स्तरावर नियंत्रण ठेवणाऱ्या अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या मान्यतेने विनाअनुदानित वर्गवारीत ऑटोनॉमस दर्जा प्राप्त करणारे महाराष्ट्रातील पहिले पॉलिटेक्निक म्हणून ऐतिहासिक मान पटकावला आहे. संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांच्या ग्रामीण विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शिक्षण देण्याच्या दूरदृष्टीतून आणि अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून संजीवनीच्या प्रत्येक संस्थेने सातत्याने नवे आयाम प्रस्थापित करत शैक्षणिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.-श्री अमित कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स

फोटो ओळीः संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी कीर्ति शिंदे व वर्षा भुजाडे यांचा सत्कार केला. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर यांचेसह डीन व विभाग प्रमुख उपस्थित होते.
