प.पू. रमेशगिरी महाराजांच्या हस्ते संजीवनी कार्यस्थळावर जनेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा संपन्न…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कर्मभूमीत (शिंगणापुर) राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती प. पू. रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी संजीवनी साखर कारखाना कार्यस्थळावर मारूती मंदिरालगत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या संकल्पनेतुन जनेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा शुक्रवारी संपन्न झाली.

      प्रारंभी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
    प.पू. रमेशगिरी महाराज याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, कोपरगांव तालुक्याची पावनभुमी संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली असुन दक्षिणगंगा गोदावरी नदी तिरावर अनेक ऋषी मुनी संत महंतांनी तपश्चर्या करून गुरु शुक्राचार्यांच्या संजीवनी मंत्राने ही भूमि सिध्द झालेली आहे. देवांचा देव महादेव असुन त्याला रूद्र नावाने देखील संबोधले जाते म्हणजेच सर्वांचे दुःख हरण करणारा महादेव असुन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी त्रंबकेश्वर दिंडीत ज्या ज्या वेळी प्रस्थान करत त्या त्या वेळी त्यांनी संजीवनीच्या मारूती मंदिरात मुक्काम करत अध्यात्म सेवा केली त्याची आठवण म्हणून या महादेवाचे आजपासून जनेश्वर महादेव मंदिर असे नामकरण होत आहे. ईश्वरीय श्रध्देतुन, नामस्मरणांतुन आपल्या सर्वांची दुःखे, चिंता हरण होवो अशी महादेवचरणी प्रार्थना असे म्हणत त्यांनी राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचा जयजयकार केला.
      या कार्यकमाचे पौरोहित्य राक्षसभूवन येथील ब्रम्हवृंद व शेगांव गजानन महाराज मंदिराचे गुरू नागेश मथुरादास चौथाईवाले उर्फ तात्यागुरू यांनी केले. त्यांना ब्रम्हवृंद रमाकांत गोडबोले, समर्थ घेवाळे, सागर पाटील, प्रमोद जोशी गुरू, रविंद्र गो-हे आदिंनी साथ दिली. यजमान म्हणुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे संचालक बापूसाहेब बारहाते, सौ. संगीता बारहाते, संजय औताडे, सौ. उषाताई औताडे हे पुजेस बसले होते. याप्रसंगी संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, श्रीमती सिंधुताई शंकरराव कोल्हे, माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे, संजीवनी युनिव्हरसिटीचे अध्यक्ष अमितदादा कोल्हे, कोपरगांव तालुका स्वयंसहायता महिला बचतगटाच्या अध्यक्षा सौ. रेणुका विवेक कोल्हे, ईशान कोल्हे, सौ. श्रध्दा ईशान कोल्हे, कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे, संचालक विश्वासराव महाले, पांडुरंगशास्त्री शिंदे, त्रंबकराव सरोदे, बाळासाहेब वक्ते, निलेश देवकर, राजेंद्र कोळपे, रमेश घोडेराव, कामगार नेते मनोहर शिंदे, स्वामी समर्थसेवा केंद्राचे संतोष जाधव, कार्यकारी संचालक सुहास यादव, सीईओ शिवाकुमार, अमोल चांदोरे, दत्तात्रय मोरे, भाजपायुवा मोर्चाचे अध्यक्ष अमोल गवळी, प्रकाश डुंबरे, तुळशीराम कानवडे, संजीव पवार, एस. सी. चिने, शशिकांत निकम, डॉ मनोज बत्रा, भास्कर बेलोटे, अशोकराव लोहकणे, धोंडीराम टेंगळे, बाजीराव शिंदे, अशोकराव देवकर, रामभाउ गव्हाळे, उस उत्पादक सभासद, शेतकरी, खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, यांच्यासह विविध संस्थाचे आजी माजी पदाधिकारी, संचालक, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांनी आभार मानले. मंदिर निर्माणकर्ते अभियंता सोमेश जगदिश कायस्थ, योगेश कुलकर्णी, नितीन आपटे यांचा यावेळी रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला. उपस्थित भाविकांना बुंदी, मसालेभात, पुरी भाजीचा महाप्रसाद देण्यांत आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे संजीवनी सांस्कृतिक मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

चौकट-
संजीवनी कार्यस्थळावरील मारुती मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास राष्ट्रसंत जनार्दन स्वामी उपस्थित होते, आज महादेवाची प्राणप्रतिष्ठा जनार्दन स्वामींचे परमशिष्य प.पू. रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते होत आहे हे आपले भाग्य असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले., उपस्थितांनी टाळयांच्या कडकडाटात साथ दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *