महिला बचतगटाच्या उत्पादनासाठी मॉल्स_ धोरणात्मक निर्णयाचे स्वागत :- स्नेहलताताई कोल्हे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
महिला सबलीकरणासाठी स्वयंसहाय्यता बचतगट ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आले, त्यातून त्यांच्या छोट्या छोट्या उत्पाद‌नांना चालना मिळाली या मालाच्या विक्री वृध्दीसाठी महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स उभारण्याचा धोरणात्मक निर्णय अर्थसंकल्पात घेतला त्याबद्‌दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे कौतुक करत या निर्णयाचे भाजपा नेत्या, माजी आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी स्वागत केले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण गेल्या काही वर्षापासून महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाचे विपणनांसाठी राज्यस्तरावर स्वतंत्र सुविधा निर्माण कराव्या अशी मागणी केली होती त्याला या अर्थसंकल्पातून चालना देण्यांत आली ही मोठी बाब आहे असे सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी स्पष्ट करत मुलींच्या शिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह‌यांत स्वतंत्र वसतीगृह निर्माण केले जाणार आहे ही बाब निश्चीतच आहे. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने आज महिला सर्वार्थाने पूढे येत आहे. ग्रामीण भागातील महिला स्वयंरोजगारातून स्वतःचे घर सावरून गांवच्या, तालुक्याच्या अर्थकारणाला दिशा देत आहे. कृषी, दुग्धपालन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, गृहउद्योग, सामुहीक शेती, सेंद्रिय उत्पादने, गो_ शेळीपालन आत आदी क्षेत्रात महिलाच सर्वार्थान पुढे आहे. त्यात प्रगती करत आहे. महिलाबचतगट ही त्यांची मोठी ताकद निर्माण झाली आहे.
आज महिला बचत गट जिल्हास्तरावर, तसेच महालक्ष्मी अशा माध्यमातून उत्पादनांची विक्री करू लागल्या आहे. महिलांनी उत्पादित केलेल्या मालाचे राज्य -देशस्तरावर विपणन व्हावे, आर्थीक समृध्दी यावी यासाठी धोरणात्मक पावले उचलावी अशी आपली सातत्याने मागणी होती ती या अर्थसंकल्पातून साकारली जात आहे याचे मनस्वी समाधान आहे. लखपती दीदी योजनेचेही व्याप्तीकरण वाढविले जात आहे, पर्यटन वृद्धीसाठी पर्यटन मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण देण्यात येणार आहे ही बाबही समाधानकारक आहे. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी यंदाचा अर्थसंकल्प सर्वोत्तम असल्याचेही सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी शेवटी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *