के. जे. सोमय्या महाविद्यालयातील वाणिज्य शाखेची गोदाकाठ उपक्रमास भेट…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
के. जे. सोमय्या महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी आज गोदाकाठ या उपक्रमास भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थी व शिक्षकांनी बचत गटातील विविध स्टॉल ला भेटी दिल्या व स्टॉल धारकांशी चर्चा केली. उत्पादन प्रक्रिया, उत्पादन खर्च, विपणन तसेच विक्री व्यवस्थापन या साठी बचत गट करीत असलेल्या उपाय योजनाची माहिती घेतली. अनेक शिक्षक व विद्यार्थ्यांनी वस्तूंची खरेदी केली. कोपरगाव तालुक्यातील धार्मिक व ऐतिहासिक महत्व दर्शविणाऱ्या प्रतिकृती पाहून विद्यार्थी भारावून गेले व हा वारसा जपण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली. कालांश उद्योगसमूहाचे संचालक श्री. रोहित काले यांनी देखील विद्यार्थ्यांच्या या समूहभेट उपक्रमाचे स्वागत करून वाणिज्य शाखा विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक अनुभव मिळवून देण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. या उपक्रमात विभाग प्रमुख प्रा. डॉ. संतोष पगारे, प्रा. डॉ. संजय अरगडे, प्रा. डॉ. रवींद्र जाधव, प्रा. अजित धनवटे, प्रा. सुनील गुंजाळ, प्रा. स्वागत रणधीर, प्रा. सोनाली आव्हाड, प्रा. विजय सोमासे, प्रा. हर्षदा पेडणेकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *