बांगलादेश मधील हिंदूंच्या हत्या थांबवाराष्ट्रीय बजरंग दल व शिवप्रतिष्ठान संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
बांगलादेश मधील अल्पसंख्याक हिंदूंच्या होत असलेल्या हत्या थांबविण्यासाठी सरकारने भूमिका घ्यावी अशी मागणीचे निवेदन आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद तसेच शिवप्रतिष्ठान संघटना यांनी तहसीलदार महेश सावंत यांना दिले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की बांगलादेश मधील शेख हसीना यांचे सरकार गेल्यापासून तेथील अल्पसंख्याक हिंदूंच्या हत्या करून छळ करण्यात येत आहे. हिंदूंची मंदिरे तोडणे,घरे तसेच दूकानांची तोडफोड करून जाळपोळ करणे असे प्रकार सातत्याने सुरू आहेत. नुकत्याच एका दिपु चंद्र दास या यूवकाची हत्या करून त्याला झाडाला बांधून जाळण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या हिंदूत्ववादी संघटनांनी विविध ठिकाणी निवेदन देऊन सदर घटनेचा निषेध केला आहे. तसेच याबाबत भारत सरकारने तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी पाऊले उचलावीत अशी मागणी करण्यात येत आहे.
यावेळी संतोष गंगवाल, कृष्णा दळवी, शिवप्रसाद बढे, अनिल गायकवाड, दत्तात्रय भागीले, श्रीकांत पायमोडे, अनिकेत पेंढारे, राहूल मोहिते, सिद्धार्थ खंडागळे, श्रेया कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *