महात्मा फुले आधुनिक भारताचे पहिले समाज क्रांतीकारक:- मुकुंद मामा काळे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
महात्मा ज्योतिबा फुले आधुनिक भारताचे पहिले समाजक्रांतीकारक म्हणुन ओळखले जातात असे प्रतिपादन श्री संत सावता माळी युवक संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष मुकुंद मामा काळे यांनी केले
कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव बघता तालुक्यातील संवत्सर रामवाडी येथे 11 मे हा महात्मा दिन घरातच साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.
यावेळी किशोर काळे यांनी सांगीतले कि आधुनिक भारतातील पहिले समाजक्रांतीकारक म्हणुन महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखले जाते.
त्यांनी ब्राम्हण-पुरोहित यांच्याशिवाय विवाह संस्कार सुरु केले व त्यास मुबंई हाईकोर्टाची मान्यता सुध्दा मिळवुन दिली महात्मा फुलेंनी केलेल्या एकत्रित संघर्षामुळे सरकारला अॅग्रीकल्चर अॅट पास करावा लागला होता.
भारतातील पहिली मुलींची शाळा, त्यांनी भिडेवाडा पुणे येथे काढली.पत्नी सावित्रीबाई फुलें यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका बनविले.
यावेळी श्री संत सावता माळी युवक संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष मुकुंद मामा काळे म्हणाले कि त्यांची समाजसेवा पाहुन 11 मे 1888 रोजी मुबंई येथे एका विशाल सभेत लाखोंच्या उपस्थितीत त्यांना ʼमहात्माʼ ही पदवी बहाल करण्यात आली दलीत आणि निराधारांना न्याय मिळावा याकरिता ज्योतिबांनी सत्यशोधक समाज’ची स्थापना केली.ज्योतिबा फुले यांना त्यानंतरच महात्मा ज्योतिबा फुले या नावाने जगभरात ओळखले लागले.शिवजयंतीचे जनक तसेच आंबेडकरांचे गुरु हे महात्मा फुले आहेत,त्यामुळेच शिवजयंती,आंबेडकर जयंती,महात्मा फुले जयंती प्रमाणेच महात्मा दिन साजरा केला जावा याकरिता श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य ही संघटना 2016 पासुन प्रयत्न करत आहेत.मागील दोन वर्ष 11 मे रोजी महाराष्ट्रातील सुमारे 25 जिल्हात महात्मा दिन साजरा केला गेला त्या निमित्ताने महात्मा फुलेंना अभिवादन करण्याबरोबरच त्यांनी लिहीलेल्या पुस्तकाचे वाटप,रक्तदान,नेत्र तपासणी मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया आरोग्य शिबिरे विधवा महिलांना साड्या वाटप पाणपोई उद्धाटन आदी कार्यक्रमांबरोबर जिल्हाधिकारी,तहसीलदार यांना महात्मा दिन प्रशासकीय स्थरावर साजरा व्हावा याकरिता सर्व जिल्हात निवेदन देण्यात आले होते.अशाप्रकारे शासन दरबारी सुद्धा प्रयत्न चालु आहेत,सर्व फुले प्रेमींनी तसेच सामाजिक,राजकीय संघटनांनी महात्मा दिन साजरा करताना महात्मा फुलेंना अभिवादना बरोबरच समाजपयोगी उपक्रम राबवायेत,असे आव्हान योगेश ससाणे यांनी केले
कृपया सामाजिक अंतर ठेवा,मास्कचा वापर करा, सॅनिटायझर चा वापर करा,बाहेरून आल्यानंतर हात व पाय स्वच्छ धुवा,आपली व कुटुंबाची काळजी घ्या,प्रशासनाला सहकार्य करा असे आव्हान महात्मा फुले मंडळ अध्यक्ष प्रदीपजी नवले,कोपरगाव नगरपालिका नगरसेवक वैभवजी गिरमे व श्री संत सावता माळी युवक संघ कोपरगाव तालुकाध्यक्ष अशोक माळवदे,शहरध्यक्ष शेखर बोरावके,संतोष रांधव,डाॅ.मनोज भुजबळ,संदीप डोखे,मनोज चोपडे,अनंत वाकचौरे,देवेश माळवदे,तुषार ससाणे,सुनिल मंडलिक आदीनी आव्हान केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *