श्री गणेश सहकारी साखर कारखाना यंदा डिस्टिलरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करणार :- विवेकभैय्या कोल्हे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी -
श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५ - २०२६ च्या गळीत हंगामाचा ६४ वा बॉयलर अग्निप्रदिपण समारंभ श्री गणेश कारखान्याचे मार्गदर्शक, जिल्हा बँकेचे संचालक युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते आणि श्री गणेशचे चेअरमन सुधीर लहारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

साखर कारखान्याचे आर्थिक गणित व्यवस्थित राहावे यासाठी उप-उत्पादनांची निर्मिती करणे आता गरजेचे आहे. त्यानुसार, श्री गणेश कारखाना यंदा डिस्टिलरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करणार आहे. डिस्लरी ३०० दिवस सुरू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती युवा नेते विवेक कोल्हे यांनी दिली. यंदाच्या वर्षी ३००० रुपये प्रति टन ऊस भाव देण्याची घोषणाही त्यांनी केली.श्री गणेश कारखाना व्यवस्थित आणि सुरळीतपणे प्रगतीपथावर जाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असेही यावेळी ते म्हणाले.
गेल्या दोन हंगाममध्ये श्री गणेश कारखान्याने शेतकऱ्यांना एफ.आर.पी. (FRP) पेक्षा जास्त भाव दिला असून यंदाही चांगला भाव देण्याची हमी विवेक कोल्हे यांनी दिली. कारखाना यंदा विक्रमी ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी कोल्हे यांनी दिली. गेल्या दोन वर्षांमध्ये शेतकरी, कामगार आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवले गेले आहेत त्यामुळे समाधान आहे असेही कोल्हे म्हणाले.

या प्रसंगी, संचालक महेंद्र गोर्डे,मनिषाताई महेंद्रराव गोर्डे, तसेच संचालक श्री मधुकरराव सातव व सौ. कल्पनाताई मधुकरराव सातव यांच्या शुभहस्ते विधिवत पूजन करण्यात आले.या प्रसंगी मार्गदर्शन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास ज्येष्ठ माजी संचालक गंगाधर नाना चौधरी, प्रभावतीताई घोगरे, सुधीर म्हस्के, डॉ. एकनाथ गोंदकर, माजी संचालक रघुनाथ गाडेकर, व्हा. चेअरमन विजयराव दंडवते, सर्व संचालक मंडळ, सर्व माजी संचालक, कार्यकारी संचालक जी. बी. शिंदे साहेब, सेक्रेटरी भोसले साहेब, तसेच सर्व संस्थेचे पदाधिकारी, कोपरगांव, राहाता, श्रीरामपूर तालुक्यातील सभासद, खाते प्रमुख, महिला भगिनी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *