संघर्षयोद्धे तरुणांना प्रेरणादायी ठरतात:-राष्ट्रसेविका भाग्यश्रीताई बडदे…

Uncategorized

लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंढे साहेब यांना ११ वे पुण्यस्मरण निमित्ताने कोपरगांकरांकडून अभिवादन…
कोपरगाव प्रतिनिधी:-
जनसामान्यांच्या विविध प्रश्नांवर रस्त्यावर उतरुन कार्यकरणारे स्व. गोपीनाथराव मुंढे, स्व. भिमरावनाना बडदे यांचे सारखे संघर्षयोद्धे तरुणांना आजही प्रेरणादायी वाटत असल्याचे धर्मयोद्धा माजी खासदार भिमराव(नाना) बडदे स्मृती प्रतिष्ठानच्या वरिष्ठ मार्गदर्शिका भाग्यश्रीताई भिमराव बडदे यांनी एका कार्यक्रमात सांगितले.
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंढे पुण्यस्मरण समिती, कोपरगांव वतीने गोपीनाथराव मुंढे यांचे ११ व्या पुण्यस्मरण निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ प्रतिमापुजन आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी धर्मयोद्धा माजी खासदार भिमराव(नाना) बडदे स्मृती प्रतिष्ठानच्या वरिष्ठ मार्गदर्शिका भाग्यश्रीताई भिमराव बडदे, आणिबाणी चळवळीचे नेते प्रकाश सवाई, मार्केट कमिटीचे संचालक रामदास केकाण, स्वच्छतादूत सुशांत घोडके, सेवानिवृत्त प्राचार्य सुरेश कातकडे, संजीवनी कारखाना संचालक सतिष आव्हाड, नर्मदेश्वर फाऊंडेशनचे संस्थापक सागर केकाण, भाजपा महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा विजयाताई देवकर, भाजपा शहराध्यक्ष वैभव आढाव, शिवसेनेचे अभिषेक आव्हाड यांचे सह कोपरगांवातील नागरिक उपस्थित होते.
या प्रसंगी आणिबाणी चळवळीचे नेते तत्कालीन राजबंदी प्रकाश सवाई म्हणाले, स्व. गोपीनाथराव मुंढे, स्व. भिमरावनाना बडदे , स्व. प्रमोद महाजन यांचेसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक यांना तत्कालीन केंद्र सरकारने १९ महिने जेल मध्ये बंदीवान केले.मुंढे, बडदे यांचे सारखी अनेक कुटुंब उध्वस्त करण्याचा सरकारने डाव आखला. मात्र ही सर्व मंडळी मोठ्या धाडसाने संघर्षाला सामोरे गेली. १९ महिने गोपीनाथराव मुंढे, भिमराव बडदे, प्रमोद महाजन आम्ही एकाच जेल मध्ये एकत्र एक परिवार म्हणून राहिलो. असे सांगत श्री. सवाई पुढे म्हणाले, नंतर गोपीनाथराव मुंढे साहेब मोठे लोकनेते झाले. कोठेही सार्वजनिक कार्यक्रमात भेटले तर आवर्जून ओळख देवून जवळ बोलवायचे. ही आठवण सांगतांना सवाई हे भावनिक होवून त्यांना अश्रू अनावर झाले.
भाजपा शहराध्यक्ष वैभव आढाव यांनी गोपीनाथराव मुंढे यांचे ऊस तोडणी कामगार ते उच्चशिक्षित लोकनेता असा प्रवास सांगितला.
सेवानिवृत्त प्राचार्य सुरेश कातकडे यांनी गोपीनाथराव मुंढे यांच्या कोपरगांवातील जुन्या आठवणी सांगितल्या. तसेच शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे यांचेशी मुंढे परिवाराशी असलेले ऋणानुबंध अनेकांनी व्यक्त केले.
प्रतिमा पुजनानंतर लोकनेते गोपीनाथराव मुंढे अमर रहे, भारत माता की जय घोषणा देण्यात आल्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी किरण आव्हाड, सचिन केकाण, गोपीनाथ सोनवणे, सतीश आव्हाड, विशाल आव्हाड, गणेश केकाण, विक्रांत सोनवणे, वैभव आढाव, शिवाजी केकाण, किशोर भाबड, सिद्धांत सोनवणे, निलेश पाखरे, चंद्रभान केकाण, मनोज केकाण, विशाल केकाण, दीपक केकाण, दत्तात्रय गरुड, सुदर्शन गरुड, नामदेव केदार, रमेश केकाण यांचेसह अनेक नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशांत घोडके यांनी तर आभार सागर केकाण यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *