
कोपरगाव प्रतिनिधी : राहता तालुक्यातील सागर कोलते या युवकाने वाढदिवसानिमित्त इतर वायफट खर्चाला फाटा देत शिर्डी येथील साई सावली अनाथ आश्रमातील लहान मुलांबरोबर केक कापून वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने तेथील लहान मुलांना पावभाजीची पंगत देऊन त्यांचा दिवस गोड केला.याबद्दल तेथील सर्व शिक्षकांनी व मुलांनी त्याचे आभार मानले.यावेळी राहुल बोटे,अनिल गाढवे, बंटी गायकवाड, विशाल कापसे, देवेंद्र सातूरे, योगेश कांबळे, पत्रकार अमोल गायकवाड इत्यादी युवक उपस्थित होते.अशाच प्रकारे इतर तरुणांनी पण आपला वाढदिवस इतर खर्च न करता अनाथ आश्रमातील मुलांना अन्नदान देऊन वाढदिवस साजरा करावा असे आवाहन वाढदिवस असणाऱ्या सागर कोलते या युवकाने केले आहे.
