अष्टविनायक मित्र मंडळाच्या वतीने स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांना भावपूर्ण आदरांजली…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- राजकीय, सामाजिक, कृषी, सहकार, सिंचन, उद्योग, शैक्षणिक क्षेत्रातील अद्वितीय कामगिरीने राज्यात व देशात आपला अमिट ठसा उमटवणारे कोपरगाव तालुक्याचे भाग्यविधाते, लोकनेते सहकारमहर्षी, माजी मंत्री व संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक स्व. शंकरराव गेणुजी कोल्हे साहेब यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आज दि.१६ मार्च २०२३ रोजी कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ अष्टविनायक मित्र मंडळाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरदनाना थोरात, माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, राजाभाऊ शिंदे, दिलीपभाऊ दारुणकर, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब नरोडे, अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, माधवराव आढाव पतसंस्थेचे अध्यक्ष विजयराव आढाव, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, भाजपचे नगर परिषदेतील माजी गटनेते रवींद्रअण्णा पाठक, भाजप तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम, शहराध्यक्ष दत्तात्रय काले, कैलास खैरे, संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप नवले, नारायणशेठ अग्रवाल, शिवसेना नेते कैलास जाधव, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, योगेश बागुल, स्वप्निल निखाडे, माजी नगरसेवक अतुलशेठ काले, बबलूशेठ वाणी, अशोकराव लकारे, संजय जगदाळे, संदीप देवकर, विनोद राक्षे, बापू पवार, शिवाजीराव खांडेकर, नसीरभाई सय्यद, सद्दामभाई सय्यद, गोपीनाथ गायकवाड, राजेंद्र बागुल, महेश खडामकर, दादासाहेब नाईकवाडे, रवींद्र रोहमारे, अविनाश पाठक, वैभव आढाव, प्रसाद आढाव, मुकुंद उदावंत, रोहित कनगरे, सुनील पांडे, विक्रांत सोनवणे, सिद्धांत सोनवणे, मुक्तारभाई शेख, खलिकभाई कुरेशी, जयप्रकाश आव्हाड, रवींद्र लचुरे, सचिन सावंत, सलीम पठाण, फकीर मोहम्मद पैलवान, अनिल नरोडे, विजय चव्हानके, सतीश चव्हाण, गोपीनाथ सोनवणे, इलियास शेख, संतोष नेरे, सागर जाधव, साई नरोडे, शंकर बिऱ्हाडे, सतीश रानोडे, प्रसाद नरोडे, संतोष साबळे, चैतन्य जगदाळे, नंदू वायडे, शफिक सय्यद, नारायण गवळी, रोहित खडामकर, राजेंद्र भंडारी, संजय खरोटे, गोरख देवडे, आसिफ शेख आदींसह भाजप, भाजयुमो, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी कष्टकरी शेतकरी, कामगार, दीन-दलितांच्या व समाजातील वंचित, शोषित घटकांच्या कल्याणासाठी तसेच कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी केलेल्या कार्याचे स्मरण केले व त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
स्व. शंकरराव कोल्हेसाहेब हे जनसामान्यांच्या हक्कांसाठी लढणारे आदर्श लोकनेते होते. त्यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून तब्बल सहा वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम प्रस्थापित केला. विविध खात्यांचे मंत्री तसेच अनेक महत्त्वाच्या संस्थांवर मानाची पदे भूषवून
जनहितासाठी भरीव कार्य केले. त्यांनी संजीवनी सहकारी साखर कारखाना, संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्था व इतर अनेक संस्थांची उभारणी करून सहकार, शिक्षण, कृषी, सिंचन व औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली. स्व. शंकरराव कोल्हेसाहेब हे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रातील दीपस्तंभ होते. त्यांच्या अकाली निधनाने फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांचे कार्य अजरामर असून, येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, अशी भावना याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *