सटाणा येथील न्यायालयाची नुतन इमारत मंजूर करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांचा सत्कार…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(सटाणा):-
सटाणा येथील न्यायालयाच्या नुतन इमारतीस महाविकास आघाडी सरकारने दिलेली प्रशासकीय मान्यता म्हणजेच सटाणा वकील संघाच्या पाठपुराव्याचे यश असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांनी केले आहे.

सटाणा वकील संघाने सटाणा न्यायालयात आयोजित एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांनी या नुतन इमारतीच्या मंजुरीसाठी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी सत्कार आयोजित केला होता. त्याप्रसंगी अॅड.पगार बोलत होते.

सटाणा न्यायालयाच्या नूतन इमारतीसाठी सटाणा वकील संघाने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांच्या माध्यमातून पालकमंत्री ना.छगन भुजबळ व शासन दरबारी पाठपुरावा केलेला होता. या पाठपुराव्यास यश मिळाले असून महाविकास आघाडी सरकारने सुमारे १० कोटी ३७ लक्ष रुपयांच्या निधीस मंजुरी दिल्याबद्दल सटाणा वकील संघ राज्य सरकारचे आभारी असल्याचे प्रतिपादन वकील संघाचे अध्यक्ष अॅड.पंडितराव भदाणे यांनी यावेळी बोलतांना केले.

सटाणा येथील न्यायालयाच्या नुतन विस्तारित इमारतीचे बांधकाम व्हावे या मागणीसाठी सटाणा वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दि. ९ ऑक्टोबर २०२१ रोजी पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यावेळी विधी व न्याय खाते हे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्याकडे असून त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन नवीन इमारतीबाबत चर्चा करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले होते. त्यानुसार या इमारतीच्या मंजुरीस पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांनी बोलतांना सांगितले.

      सटाणा न्यायालयीन इमारतीस मिळालेली प्रशासकीय मान्यता मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे व पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांच्यामुळेच मिळाली असल्याने इतर कोणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे सटाणा शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी यावेळी बोलतांना केले.
      यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अॅड.पंडितराव भदाणे, सचिव अॅड.आर.एम.जाधव, अॅड. हिरामण सोनवणे, अॅड. एम.सी.सावंत, अॅड. एस.आर.चिंधडे, अॅड. सौ.एस.डी.चंद्रात्रे, खजिनदार अॅड. मनिषा ठाकूर, अॅड.ए.एल.पाटील, अॅड.आर.जे.पाटील, अॅड.सी.एन.पवार, प्रास्ताविक अॅड.पी.पी.भामरे, अॅड.पी.के.गोसावी, अॅड.व्ही.बी.सोनवणे, अॅड.एस.आर.सोनवणे, अॅड.एस.व्ही.मुंजवाडकर, अॅड.के.पी.भदाणे, अॅड.एन.ए.डांगरे, अॅड. वाय.एच.पाटील, अॅड. मोरेश्वर हिरे, अॅड. प्रणव भामरे, अॅड. शाम मानकर, अॅड. एस.पी.पाठक, अॅड. के.के.देवरे, अॅड. एस.एस.चिंधडे, अॅड. रुपाली पाठक, अॅड. दर्शना मोटवानी आदी उपस्थित होते.

फोटो ओळी:- सटाणा येथील न्यायालयाची नुतन इमारत मंजूर करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांचा सटाणा न्यायालयात सत्कार करतांना वकील संघाचे अध्यक्ष अॅड.पंडितराव भदाणे, सचिव अॅड. आर.एम.जाधव, अॅड. हिरामण सोनवणे, अॅड. एम.सी.सावंत, अॅड. एस.आर.चिंधडे, अॅड. सौ.एस.डी.चंद्रात्रे आदी दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *