लिनेस क्लब ऑफ कोपरगावच्या अध्यक्षपदी अंजली राम थोरे यांची निवड….

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
लिनेस क्लब ही संस्था राष्ट्रीय पातळीवर काम करणारी असून, ऑल इंडिया लीनेस क्लब मल्टिपल चतुर्भुजा अंतर्गत MH 3 गोदातरंग, लिनेस क्लब ऑफ कोपरगाव, ही एक सामाजिक काम करणारी संस्था असून या संस्थेद्वारे सामाजिक क्षेत्रात मोठ्या स्वरूपात काम केले जाते. समाजातील गरजूंसाठी योगदान देणारी संस्था अशी या संस्थेची ओळख आहे. यापूर्वी भावना गवांदे, अस्मिता लाडे, रोशनी भट्टड यांनी लिनेस क्लब ऑफ कोपरगाव या संस्थेद्वारे विशेष कामगिरी करून क्लबला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. तसेच क्लबच्या सर्वेसर्वा चार्टड मल्टिपल प्रेसिडेंट डॉक्टर वर्षा झवर यांनी क्लबला एका धाग्यात बांधून ठेवले आहे.


अशा विशेष कामगिरी असलेल्या लिनेस क्लब ऑफ कोपरगावची 2025 या वर्षाची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली. ज्यामध्ये अध्यक्ष म्हणून अंजली राम थोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर सचिव म्हणून सोनाली अक्षय गिरमे आणि खजिनदार म्हणून सरिता चोप्रा यांची निवड करण्यात आली. तसेच नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा 21 जानेवारी 2025 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. चार्टर्ड मल्टिपल प्रेसिडेंट डॉक्टर वर्षा झवर यांनी पास्ट डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट लतिका पवार अहिल्यानगर यांच्या प्रमुख उपस्थितीत पदग्रहण समारंभ पार पडला.


यावेळी क्लबच्या नूतन अध्यक्ष अंजली थोरे यांनी क्लबचा पदभार स्वीकारताना विशेष आनंद होत आहे असे सांगून येणाऱ्या वर्षांमध्ये शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्य विषयक अशा विविध प्रकारच्या क्षेत्रांमध्ये विशेष कामगिरी करण्याचा मानस असल्याचे सांगितले. परंतु शिक्षण ही काळाची गरज आहे त्यामुळे 2025 या वर्षांमध्ये शैक्षणिक कामगिरी विशेष असणार आहे असे सुचवले. त्यासाठी त्यांनी लिनेस क्लब ऑफ कोपरगाव ची पिन तयार केली असून त्यावर एक कदम शिक्षा की ओर अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. आणि त्या अनुषंगाने संपूर्ण वर्षभर विद्यार्थ्यांच्या शारीरिक भावनिक आणि बौद्धिक विकास होण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम या वर्षांमध्ये घेतले जाईल अशी माहिती दिली.


सदर प्रसंगी छाया राजपूत, नेहा बत्रा,अंजू पंजाबी, शोभना डोळे, दीपा ठोळे ,किरण डागा कामिनी शेटे,भावना गवांदे, स्मिता रोहमारे,निता मुंदडा, ज्योती शिंदे डॉक्टर राजश्री उंबरकर, भारती अग्रवाल, राजश्री गुजराती, स्मिता लोढा, स्वीटी भुसारी, शीला राशिनकर सोनाली जाधव, गायत्री कुलकर्णी, कल्याणी गंगवाल, निशा शिंगी आणि इतर सदस्य उपस्थित होते..
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना गवांदे यांनी केले कार्यक्रमाचे आभार सोनाली गिरमे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *