महात्मा फुले कृषि विद्यापीठात क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रवींद्र बनसोड यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी यंत्रे व शक्ती अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सचिन नलावडे, काष्टी, ता. मालेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचे प्रमुख डॉ. सचिन नांदगुडे, जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. शैलेश गडगे, कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. तुळशीदास बाष्ठेवाड, डॉ. ममता पटवर्धन, प्रा. विक्रम पाटील, कॅप्टन डॉ. सुनील फुलसावंगे व महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण निदेशक तथा सहाय्यक कुलसचिव श्री. वैभव बारटक्के उपस्थित होते.
यावेळी डॉ. रवींद्र बनसोड मार्गदर्शन करताना म्हणाले की जीवनामध्ये अभ्यासाबरोबरच खिलाडूवृत्ती व दैनंदिन जीवनामध्ये खेळासाठी वेळ काढणे महत्त्वाचे आहे. कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या काळामध्ये ज्यांची प्रतिकारशक्ती उत्तम होती अशा नागरिकांना त्यातून बाहेर पडण्यास मोलाची मदत झाली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा सप्ताहामध्ये जागृत ठेवून उत्साहाने सहभागी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. या क्रीडा सप्ताहामध्ये मैदानी क्रीडा स्पर्धा, बॅडमिंटन, बुद्धिबळ, हॉलीबॉल, फुटबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो या प्रकारातील क्रीडा स्पर्धा होणार असून यामध्ये महाविद्यालयाचे 240 विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. या क्रीडा सप्ताहाचे आयोजन महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण निदेशक तथा सहाय्यक कुलसचिव श्री. वैभव बारटक्के यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *