

कोपरगाव प्रतिनिधी:-
मा श्री सुहास जगताप सर
मुख्याधिकारी कोपरगाव नगरपरिषद कोपरगाव
विषय :-गोदावरी नदीच्या पुलाला जाळ्या बसविणे रक्षा कुंड करणे दशक्रिया विधी केल्यानंतर पिंडदान ठेवण्यासाठी ओटा बनविणे निर्मल्य कलश बसविणे.
महोदय
आपणास विनंतीपूर्वक अर्ज करतो की
कोपरगाव शहरातून पवित्र दक्षिणगंगा वाहत असून बेट भाग कोपरगाव जोडण्यासाठी जो पूल आहे त्या पुलाला जाळ्या बसवण्यात यावे यामुळे जीवित हानी टळू शकते आणि जे लोक नदीपात्रामध्ये पुलावरून कचरा फेकतात घाण टाकतात ती थांबण्यास मदत होईल.
याचबरोबर पवित्र दक्षिणगंगा गोदावरी मध्ये जी रक्षा विसर्जित होते त्यासाठी स्वतंत्र कुंड बनविले तर त्या कुंडामध्ये रक्षा विसर्जन करणे सोपे जाईल जेणेकरून लोकांना आंघोळ करताना जी रक्षा हातात येते ती येणार नाही व पाणी पिण्यासाठी संकोच वाटणार नाही.
निर्मल्य कलश बसवला तर जे लोक प्लास्टिक गोधड्या कपडे चपला बूट असे अनेक प्रकारची घाण नदीपात्रामध्ये टाकतात ती टाकणार नाही आणि आपली पवित्र दक्षिण गंगा गोदावरी प्रदूषित होणार नाही ती स्वच्छ सुंदर राहील.
तरी आपणास आम्ही विनंती करतो आपली जीवनदायिनी आई गोदावरी वाचवण्यासाठी वरील सर्व उपाययोजना लवकरात लवकर कराव्या . यापूर्वी पण नगरपरिषदेला वेळोवेळी अर्ज दिलेले आहे पण कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.
ही विनंती करतो.
धन्यवाद
जय गोदामाई जय त्रंबकराज जय शुक्राचार्य महाराज
