कोपरगाव येथे आदिवासी महादेव कोळी समाजाचे विविध मागण्यासाठी २ ऑक्टोबर पासून बेमुदत धरणे आंदोलन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव वार्ताहर – कोपरगाव येथे आदिवासी महादेव कोळी युवक संघ जिल्हा शाखा अहमदनगर यांच्या वतीने विविध मागण्यासाठी 2 ऑक्टोबर 2024 पासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक शेजारी खालील मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू झाले आहे.
१) धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देण्यात येऊ नये.

२ ) मान. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितल्यानुसार जात पडताळणी समित्या रद्द करण्यात याव्या.

३) सुप्रीम कोटीतील माधुरी पाटील केस मधील आदेशानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी महादेव कोळी समाजाला ” कोळी “नोंदीवरून जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र विनाअट देण्यात यावेत.

४) कुटुंबातील सवींना एकाच वेळेस जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावेत. ४

५) अ. नगर जिल्ह्यासाठी मंजूर असलेली अनु. जमाती जात पडताळणी समिती शिर्डी येथे त्वरित सुरूकरण्यात यावी, त्याचप्रमाणे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजूरचे उपकेंद्र शिडी येथे व्हावे.

६ ) उच्चवर्णीय समाजाला (ब्राह्मण) आदिवासी समाजाचे जात वैधता प्रमाणपत्र (कपल व्हॅलिडीटी) दिलेले आहे., त्या समितीवर व वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या दोघांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

७) श्री. किरण माळी, सह आयुक्त अनु. जमाती जात प्रमाणपत्र तपासणी समिति नाशिक यांचेवर लाच लुचपत विभागाने लाच घेतल्या प्रकरणी कार्यवाही केली होती त्यांना पदावरुन दूर करण्यात यावे. ही मागणी मा. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांनीच विधानसभेत केली होती. त्याची अमलबजावणी करावी. तसेच त्यांचे काळात दिलेल्या वैधता प्रमाणपत्र देताना मोठी आर्थिक देवाण घेवाण झाली असल्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी. या मागणीसाठी राज्याचे महसूल मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यात आलेले आहेत .या मागण्यांची पूर्तता न झाल्यास जिल्ह्यातील सुमारे दीड लाख आदिवासी महादेव कोळी समाज या आंदोलनात टप्प्याटप्प्याने सहभागी होणार असल्याची माहिती अमित आगलावे जिल्हाध्यक्ष यांनी दिली ,असून आदिवासी समाजावर कायमच स्वातंत्र्यानंतर अन्याय झालेला आहे हा अन्याय कोणत्याही परिस्थितीत लोकशाही व कायदेशीर मार्गाने दूर करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला जाईल .तसेच या आंदोलनात सहभागी होण्यासाठी समाजाला सुद्धा सक्रिय सहभागी होण्यासाठी त्यांनी आवाहन केले आहे. या आंदोलनाची दखल प्रशासनाने वेळीच घेतली नाही व भ्रष्टाचार या अधिकाऱ्यांना पाठीशी घातल्यास महाराष्ट्रभरातील विविध आदिवासी संघटना व इतरही सामाजिक संघटना या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होतील व आदिवासी बांधवांना कोणत्याही परिस्थितीत यश मिळवून देतील माहिती त्यांनी यावेळी दिली .यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गणपत मामा दवंडे यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. त्यावेळेस ते म्हणाले-” आदिवासी समाज लाजरा व सहनशील असल्यामुळे प्रशासनातील प्रत्येक घटक त्यांच्यावर अन्याय करत आहेत. समाजाने उपस्थित केलेले प्रश्न कायद्याच्या चौकटीत बसत असल्यामुळे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांनी विशेष लक्ष देऊन समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करावी अशी विनंती त्यांनी यावेळी केली. यावेळेस सुरेश कांगुणे, चंद्रकांत शेजुळ ,दत्तोबा वायखिंडे ,संजय वायखिंडे भगवान मेढे संजय रविंद्र जाधव मधुकर लंगोटे साळुंखे भरत आगलावे अंबादास दरेकर आरपीआय तालुका अध्यक्ष दीपक गायकवाड एकलव्य संघटना तालुका अध्यक्ष उत्तम पवार हंसराज लवांडे इत्यादी समाज बांधव उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *