खासदार डॅा. सुजय दादांची साईबाबा संस्थान कोविड ला भेट..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी (शिर्डी):-
आज शिर्डी येथे साईबाबा कोव्हीड रुग्णालयात कोव्हीड नियमांचे पालन करत नववर्षाची गुढी उभारून खासदार डॉ.सुजयदादा विखे पाटील यांच्यासह अधिकारी पदाधिकारी यांनी पाडव्याचा सण रुग्णासमवेत साजरा केला, या प्रसंगी रूग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे मनोबल वाढावे यासाठी त्यांना स्वत:च्या हाताने जेवण वाढले.


काल मा. ना. श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व आरोग्य अधिकारी पदाधिकारी यांची बैठक घेवून या कोविड रूग्णांना अधिक सेवा कशी देतां येईल व कोविडची संख्या कशी आटोक्यात येईल या संबधीच्या सुचना तसेच या मध्ये कुणी ही हलगर्जी पणा केल्यास संबंधीत आरोग्य कर्मचारी, अधिकारी, डॅा. यांची गय केली जाणार नाही या शब्दात सर्वांना सुचना केल्या तसेच रेमडिसिविर इंजेक्शनचा पुरवठा लवकरात लवकर करावा या साठी मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी फोनवर चर्चा करून संबंधित रूग्णांची व कोविडची माहिती दिली.


यांवर आज रेमडिसिविर या इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला परंतु गरज असणाऱ्या रूग्णांना इंजेक्शन देण्यास विलंब होत असल्याची तक्रार नातेवाईकांना केल्या नंतर दादांनी संबंधित डॅाक्टर व अधिकारी यांना जाब विचारत रूग्णांची जाण्याची वाट बघताय काय जबाबदारी ने वागा या शब्दात खडे बोल सुनावल्या नंतर काही वेळातच गरज असणाऱ्या रूग्णांना इंजेक्शन देण्यात आले.
या नंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डी यांच्या वतीने नव्याने उभारण्यात येणाऱ्या सुपर हाँस्पिटल मध्ये नवीन कोविड सेन्टर च्या जागेची पाहणी केली. याप्रसंगी आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
जय साईनाथ !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *