महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या अंगरक्षकांचा प्रामाणिकपणा..!

कोपरगाव

बसस्टॅन्डवर सापडलेले पाकीट केले परत..!

कोपरगाव प्रतिनिधी:-नामदार बाळासाहेब थोरात यांचे अंगरक्षक म्हणून कार्यरत असलेले पोलीस काॅस्टेबल रमेश काळु शिंदे कामानिमित्त संगमनेर बस स्टॅन्ड येथून अहमदनगर येथे चालले होते. यादरम्यान रमेश शिंदे यांना संगमनेर बसस्टॅन्डवर एक पाकीट पडलेले दिसले. त्यांनी सदर पाकीट ताब्यात घेऊन थोडावेळ हरवेले पाकीट घेण्यासाठी कोणी येतेका यांची वाट पाहिली. मात्र या पाकीटाची चौकशी करण्यासाठी कोणी आले नाही.या पाकीटामध्ये ड्रायव्हिंग लायसन, ATM कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि रोख रक्कम यांसह महत्वाची कागदपत्रे होती.या कागदपत्राची शहाणशिहा केली असता सदर पाकीट धारक व्यक्ती अहमदनगर येथील रहिवासी होता. थोड्यावेळानंतर एक व्यक्ती हरवलेल्या पाकीटाचा शोध घेण्यासाठी बसस्थानकावर आला. आजूबाजूला पाकीट शोधू लागला. सदर व्यक्तिचा गोंधळलेला चेहरा पाहून ती पाकीट शोधत आहे. हे रमेश शिंदे यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच त्या व्यक्तीला आवाज देऊन बोलावले व काय शोधत आहात हे विचारले. सदर व्यक्तीने पाकीट शोध आहोत असे सांगितले. शहाणशिहा केल्यानंतर रमेश शिंदे यांनी त्या व्यक्तीचे पाकीट परत दिले.पाकिट मिळाल्यानंतर सदर व्यक्तीस खुप आनंद झाला. त्यांने रमेश शिंदे यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले.महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात हे सर्वसामान्याचे नेते असून तालुक्यातील जनता “एक तालुका एक परीवार आहे”. ते सातत्याने तालुक्याची काळजी घेत असतात. प्रत्येक आपत्तीच्या वेळी ते खंबीरपणे नागरिकांच्या पाठीशी उभे राहतात. त्यांचा हाच गुण त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये देखील उतरला आहे आणि त्यांच्या स्वभावाचा एक आपसूक भाग बनला आहे. संगमनेर बसस्थानकावर रमेश शिंदे यांनी वाटसरूला केलेल्या मदतीतून याचा परत एकदा प्रत्यय आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *