कथेतून बोध घेतला तर कित्येक जन्माची व्यथा निवृत्त होते -परमानंद गिरी महाराज…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कितीही यज्ञ करा, नाम, जप, तप करा परंतु जर व्यसन सुटत नसेल, शुद्ध सात्विक आहार करत नसेल तर सर्व पुण्य रसातळाला जाते. नियम पाळून भगवंताचे चिंतन, नामजप करत असेल तर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.असे प्रतिपादन महामंडलेश्वर परमानंद गिरी महाराज यांनी केले आहे.
तालुक्यातील कान्हेगाव येथे जपाणुष्टाण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून प्रवचन प्रसंगी ते भाविकांना उपदेश करतांना ते बोलत होते.
भगवंताचे नाम आणि काम याचा विसर होता कामा नये तो जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो. सर्व भक्ती, मुक्ती, रिद्धी, सिद्धी जोडल्या जातात. जो चिंता करतो आणि चिंतन करत नाही त्यांना नामाचा महिमा कळत नाही, कथेतून बोध घेतला तर कित्येक जन्माची व्यथा निवृत्त होते. संतांचा महिमा संतच जाणतात, इतरांना संतांचा महिमा कळत नाही. काहीकाही १०० किमी वरून येतात तर जे जवळचे अभागी आहेत ते येत नाही.असे महाराजांनी यावेळी सांगितले.
सदर सत्संग प्रसंगी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.यावेळी
कान्हेगाव,वारी, भोजडे ,रामवाडी, संवत्सर,धोत्रे,तळेगाव, अंदरसुल, सडे आदीसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किसन काजळे,संदीप वाळुंज,बाळासाहेब काजळे,राजेंद्र सांगळे,वसंतराव भाकरे ॲड वाल्मीक काजळे, सुनील काजळे यांचेसह सर्व तरुण मंडळ,भजनी मंडळ परिश्रम घेत आहेत.

चौकट:
१). आज सायंकाळी साडे सहा वाजता भगवान नृसिंह जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.तरी जिल्ह्यातील भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समस्थ ग्रामस्थांनी केले आहे.

२)आ.आशुतोष काळे यांनी सप्ताहस्थळी भेट दिली .यावेळी नृसिंह देवस्थानला ७०लाख रुपयांचा निधी मिळवून दिला असल्याचे सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *