प्रहार श्रमिक सेवा संघाचे अध्यक्षपदी आप्पासाहेब ढूस, तर सचिवपदी बाळासाहेब कराळे यांची निवड…

Uncategorized

आ. बच्चुभाऊ कडू यांचे हस्ते ढूस यांनी स्विकारले संघ नोंदणी प्रमाणपत्र….
कोपरगाव प्रतिनिधी
अचलपूर (अमरावती):- दि. २५ नोव्हेंबर २२
प्रहार जनशक्ति पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री आ. बच्चुभाऊ कडू साहेब यांचे आदेशाने नुकतीच प्रहार श्रमिक सेवा संघाची स्थापना होऊन अध्यक्षपदी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस, तर सचिवपदी प्रहार कामगार सेलचे श्रीरामपूर क्षेत्राचे अध्यक्ष बाळासाहेब लक्ष्मण कराळे यांची निवड करण्यात आली असून दि. २५ नोव्हेंबर २०२२ रोजी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे कुरळ पूर्णा गावी आ. बच्चुभाऊ कडू साहेब यांचे हस्ते आप्पासाहेब ढूस यांना संघाचे नोंदणी प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अभजितदादा पोटे, प्रहारचे जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, प्रहारचे नेवासा तालुका अध्यक्ष जालिंदर अरगडे आदी उपस्थित होते.
प्रसंगी बोलताना आप्पासाहेब ढूस यांनी सांगितले की, प्रहार जनशक्ती पक्षाच्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्र कामगार सेलचे प्रमुख श्री बाळासाहेब कराळे यांचे नेतृत्वाखाली असंघटित बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये असंघटित बांधकाम कामगारांना जवळपास सातशे पेटी वाटप झाले असून कित्येक कामगारांना विविध आर्थिक लाभ मिळवून दिले आहेत. त्यामध्ये कित्येक कामगारांना साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत मिळवून देण्याचे काम असेल. कित्येक कामगारांच्या पत्नीच्या बळंतपणासाठी शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे काम असेल. कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक लाभ. शासनाच्या मध्यान भोजन योजनेचा लाभ असे अनेक लाभ कामगारांना मिळवून दिले आहेत. तसेच नुकतेच शासनाकडून कामगारांना मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. चालू शैक्षणिक वर्षामध्ये कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेचा संघटनेकडून पाठपुरावा चालू आहे. शासनाच्या नियमानुसार कामगारांचे प्रशिक्षण शिबिर घेतले आहे. तसेच कामगारांना इश्रम कार्ड वाटप केले असून यापुढेही संघटनेच्या वतीने कामगारांसाठी शासनाच्या विविध योजना राबवून कामगारांना त्याचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे.
पुढे बोलताना ढूस यांनी सांगितले की लवकरच प्रहार श्रमिक सेवा संघाच्या मुख्य कार्यालयाचे देवळाली प्रवरा या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार असून लवकरच श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये आदरणीय बच्चुभाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये असंघटित कामगारांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अभजितदादा पोटे, राजे जिल्हा सल्लागार मेजर महादेव आव्हाड, प्रहारचे जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, प्रहारचे नेवासा तालुका अध्यक्ष जालिंदर अरगडे, प्रहार जिल्हा सल्लागार पांडुरंग औताडे, प्रहार वाहतूक जिल्हाप्रमुख माऊली सांगळे, प्रहार सोशल मीडियाचे जिल्हाप्रमुख संजय वाघ, प्रहार धरणग्रस्त जिल्हाध्यक्ष कृष्णा सातपुते, प्रहार किसन आर्मी चे रघुनाथ आरगडे, माजी सनदी अधिकारी दत्ता कडू पाटील, राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे, तसेच श्रामपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे प्रहार चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव खडके, प्रहार शहराध्यक्ष विजय कुमावत, राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष शरद वाळुंज, देवळाली प्रवरा महिला शहराध्यक्ष भाग्यश्री कदम, राहुरी फॅक्टरी महिला शहराध्यक्ष रजनीताई कांबळे आदींसह अहमदनगर जिल्ह्यातील प्रहार पदाधिकाऱ्यांनी आप्पासाहेब ढूस व बाळासाहेब कराळे यांचे निवडीबद्दल समक्ष भेटून तसेच दूरध्वनीद्वारे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *