“कोपरगाव ते अहमदनगर रस्त्यावरील जड वाहतूक अन्य मार्गे वळवावी”:- ॲड. नितिन पोळ…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव ते अहमदनगर रस्त्याचे दुरुस्तीचे काम सूरु असून या महामार्गा वरील जड वाहतूक अन्य मार्गे वळवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष ॲड. नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
आपल्या प्रसिद्धी पत्रकात पोळ पुढे म्हणाले की, मागील अनेक वर्षापासून अत्यंत दुरवस्था झालेल्या कोपरगाव ते अहमदनगर रस्त्याचे दुरुस्तीचे काम दोन टप्प्यात सूरु आहे. या महामार्गावर मोठी जड वाहतूक आहे अनेक ठिकाणी रस्त्याचे काम सूरु असल्याने रस्ता खोदलेला आहे त्यामुळे वाहनांच्या मोठ्यांच्या मोठ्या रांगा लागल्या जातात त्याच प्रमाणे दुरुस्तीचे काम सूरु असल्याने अनेक अवजड डंपर द्वारे खडी, मुरून टाकण्याचे तर ठिक ठिकाणी काँक्रिटी करणा चे काम सूरु आहे अशात वाहनांच्या मोठ्यां रांगा लागल्याने अनेकदा लहान वाहन चालक व मोटार सायकल चालक या नवीन कामावरून गाड्या चालवतात वाहनांच्या गर्दी मुळे छोट्या मोठ्या अपघाताचे प्रमाण वाढले
काल या वाहनाच्या गर्दीत अपघात होऊन कोपरगाव बेट नाक्याजवळ विनाकारण एका महिलेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला
मागील वर्षी या रस्त्यावरील ऐतिहासिक खड्डे बुजविण्यासाठी या रस्त्यावरील जड वाहतूक अन्य मार्गे वळविण्यात आली होती,सदर खड्डे प्रत्यक्षात बुजवले की कागदावर हा भाग निराळा असला तरी जड वाहतूक अन्य मार्गे वळविण्यात आल्याने अपघाताचे प्रमाण कमी झाले होते तर छोट्या वाहन चालकानी काही काळ सुटकेचा श्वास सोडला होता
मात्र आता एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्याचे काम सूरु आहे मात्र अजुन तरी जड वाहतूक अन्य मार्गे वळविण्यात यावी, तसेच हे काम सूरु असताना रस्त्याला प्रचंड धूळ उडत असताना मोटार सायकल वरून प्रवास करणारांना प्रचंड धुळीचा सामना करावा लागू नये म्हणून धूळ उठू नये म्हणून पाणी मारण्याचा हा शहाणपणा बांधकाम विभागाला सुचला नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका व मार्च एंड पर्यंत भरमसाठ बिले काढण्याच्या तयारीत असल्याने रस्ता दुरुस्त करण्यासाठी लगबग सुरू असली तरी जड वाहतुकीचा व या रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे सर्वसामान्य वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो तर अनेकदा आपला जीव गमवावा लागतो त्यामुळे या रस्त्याचे दुरुस्तीचे काम सूरु आहे तो पर्यंत कोपरगाव ते अहमदनगर रस्त्यावरील जड वाहतूक अन्य मार्गे वळविण्यात यावी, अन्यथा सर्वसामान्य प्रवाशांच्या जिविताचे रक्षण व्हावे यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल तसेच दुर्दैवी अपघातात जखमी अगर मृत्यूस जबाबदार म्हणून बांधकाम विभागाला जबाबदार धरण्यात येईल अशी मागणी या पत्रकाद्वारे केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *