के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात नुकताच मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी. आर. सोनवणे यांनी दिली आहे. प्रसिद्ध लेखक, कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणुन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधुन महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, चासनळी येथील कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा . एन.जी. बारे, उपप्राचार्य प्रा. बी. आर. सोनवणे, प्रा. एस. बी. जगझाप यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी मराठी भाषेची गौरवशाली परंपरा नमूद करतांना आपण सर्वांनी आपल्या जीवनात मातृभाषेला सर्वोच्च स्थान दिले पाहिजे असे सांगितले. उपप्राचार्य एन.जी.बारे यांनी आपल्या मार्गदर्शनात मराठी भाषा ही आपली माता आहे. तसेच मराठी भाषेला अधिकाधिक संपन्न करण्यासाठी व तीचे जतन व संवर्धन करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. मराठी भाषेचे साहित्यिक योगदानही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांसमोर मांडले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी. आर. सोनवणे यांनी ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रजांचे मराठी भाषेतील योगदान स्पष्ट केले. यावेळी कला शाखेतील अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगते सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी. व्ही. मोरे यांनी तर आभार प्रा. ए. एफ. सूर्यवंशी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *