
कोपरगाव प्रतिनिधी:- राष्ट्रसंत जनार्दन स्वामी होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज व रिसच सेंटर कोकमठाण कोपरगाव येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय वैदयकीय शिक्षण- शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा राबविण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन माननीय डॉ.अजित फुंदे पाटील (MUHS standing Committee Member). संस्थेचे अध्यक्ष चांगदेव कातकडे सचिव प्रसाद कातकडे,विजय कोटमे तसेच होमिओपॅथीक कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सावनी यरणाळकर यांच्या हस्ते झाले.
या कार्यशाळेत मार्गदर्शक वक्ते विषय तज्ञ म्हणून डॉ. कमलेश बागमार, डॉ.मुकेश पारेवाल,डॉ.अपर्णा पारिक डॉ. सुवर्णा काळे,डॉ.संतोषक मार गिते, डॉ.कैलाससिंग परदेशी इत्यादी उपस्थित होते.सदर कार्यशाळेस एकूण ३० वैदयकीय शिक्षकांनी सहभाग नोंदविला.वैदयकीय शिक्षकांना नविन शैक्षणिक वैदयकीय शिक्षण धोरणांनुसार तसेच विदयार्थी केंद्रित शिक्षण प्रणाली मार्गदर्शन करण्यात आले.प्राचार्या डॉ.सावनी यरणाळकर यांच्या मार्गदर्शना – खाली डॉ.व्यंकटेश खाडे, डॉ.वैशाली विचारे,डॉ.अर्चना पवार डॉ. विनया भांगे,डॉ.धनेशकुमार गांधी डॉ. संतोषकुमार गीते यांनी कार्यशाळेत यशस्वी रित्या जबाबदारी पार पाडली.
