
कोपरगाव प्रतिनिधी:-
सन २०२१-२२ चा लाभांश वितरण समारंभ कोपरगांव पिपल्स बँकेत नुकताच संपन्न झाला . या प्रसंगी औपचारिकरित्या बँकेचे जेष्ट ५ सभासदांना संचालकांच्या वतीने लाभांश प्रदान करण्यात आला या प्रसंगी बँकेचे जेष्ठ सभासद श्री . माधवराव माणिकराव देशमुख , श्री . तुलसीदास रिजमल खुबाणी , श्री . दिलीपकुमार राधाकिसन बजाज , श्री . विजय फुलचंद बंब , श्री . सुनिलकुमार उत्तमचंद गंगवाल यांना प्रथम लाभांश देऊन लाभांश वितरणास सुरूवात करण्यात आली . यावेळी झालेल्या समारंभात बोलतांना श्री . तुळसीदास खुवाणी यांनी सांगीतले की सातत्यांने सभासदांना १५ टक्के लाभांश देणारी कोपरगांव पिपल्स जिल्ह्यातील एकमेव बँक आहे . तसेच या पूर्वी सभासदांना चांदीचा ग्लास व भेटपावती दिलेली आहे याची आठवण करून दिली . तसेच आपली बँक इतर बँकासारखी इतर चार्जेस लावत नाही व कर्मचारी चांगली सेवा देतात असेही सांगितले . या प्रसंगी श्री माधवराव देशमुख यांनी सांगितले की बँक आमच्या सारख्या जेष्ठ नागरीकांना सुध्दा चांगल्या प्रकारे सेवा देत आहे . या वेळी समारंभात बोलतांना अध्यक्ष श्री . सत्येन मुंदडा यांनी सांगीतले की , कोपरगांव पिपल्स बँकेची चालू असलेली यशस्वी घौडदौड व भक्कम आर्थिक परिस्थिती यामुळे सभासदांना १५ टक्के लाभांश देणे शक्य झाले असुन , या भक्कम आर्थिक स्थितीमुळे बँकेने सभासद व ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे . अत्यंत थोड्या अश्या निरोगी बँकांमध्ये कोपरगांव पिपल्स बँक असल्याने यावर्षीही बँकेला अॅडीट वर्ग अ मिळाला आहे व सर्वाच्या सहकार्याने बँक प्रगतीपथावर असुन बँकेच्या सेवाचा लाभ घ्यावा असे श्री . कैलासशेठ ठोळे यांनी सांगितले . सर्व सभासदांनी बँकेतुन लाभांशाची रक्कम घेवून जावी असे आवाहन उपध्याक्षा सौ . प्रतिभा सुनिल शिलेदार यांनी केले . लाभांश वाटप समारंभा प्रसंगी बँकेचे संचलाक मंडळ सदस्य डॉ . श्री . विजयकुमार कोठारी , श्री . सुनिल कंगले , श्री . रविंद्र लोहाडे , श्री . धरमकुमार बागरेचा , श्री . कल्पेश शहा , श्री . अतुल काले , श्री . राजेंद्र शिंगी , श्री . वसंतराव आव्हाड , श्री . सुनिल बंब , श्री . रविंद्र ठोळे , श्री . हेमंत बोरावके , श्री . यशवंत आबनावे सौ . प्रभावती पांडे , श्री . संजय भोकरे , श्री . प्रसन्ना काला , बँकेचे जनरल मॅनेजर दिपक एकबोटे असि . जनरल मॅनेजर जितेंद्र छाजेड आदी उपस्थित होते . समारंभाचे सुत्रसंचालन सौ . पुजा पापडीवाल यांनी केले व प्रस्तावना चंद्रशेखर व्यास यांनी केली आणि अध्यक्ष सत्येन मुंदडा यांनी उपस्थितांचे आभार मानले .
