संजीवनी अकॅडमीच्या साई भागवतची महाराष्ट्र र संघात निवड ,१७ वर्ष वयोगटांतर्गत साईने दाखविला अष्टपैलु खेळ…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व विभागीय क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपुरच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा व निवड चाचणी विभागीय क्रीडा संकुल मानकापुर, नागपुर येथे नुकतीच पार पडली. यात १७ वर्षाखालिल वयोगटात संजीवनी अकॅडमीचा अष्टपैलु खेळाडू साई योगेश भागवत याची राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली, अशी माहीती संजीवनी अकॅडमीच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
ग्रामीण विध्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देवुन त्यांना भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता विकसित करण्यासाठीची तळमळ संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांची असायची. वयाच्या ९३ व्या वर्षीही ते रोज सकाळी स्कूल मध्ये जावुन तेथिल कामकाजाची आणि विध्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती घ्यायचे. त्यांनी घालुन दिलेली शैक्षणिक आचारसंहिता स्कूलच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे ह्या संस्थेचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे नेत आहे. यामुळे संजीवनी अकॅडमीचे विध्यार्थी देश पातळीवर सुध्दा वेगवेगळ्या क्षेत्रात नवनवीन कीर्तिमान स्थापित करीत आहेत.
चि. साईची महाराष्ट्राच्या संघात निवड झाल्याबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी अभिनंदन करून त्याला राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर डॉ. कोल्हे यांनी साईला प्रशस्तीपत्र देवुन सत्कार केला. यावेळी प्राचार्या शैला झुंजारराव व क्रीडा प्रशिक्षक सुजय कल्पेकर उपस्थित होते. साई आता आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक श्री अक्षय येवले, श्री सुजय कल्पेकर व क्रीडा विभाग प्रमुख श्री विरूपक्ष रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्पर्धेची तयारी करीत आहे. या स्पर्धा राजस्थान मधिल बिकानेर येथे होणार आहे.

फोटो ओळीः संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी खेळाडू साई भागवत याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या शालेय सॉफ्टबॉल संघात निवड झाल्याबध्दल त्याचा प्रशस्तीपत्रक देवुन सत्कार केला. यावेळी प्राचार्या झुंजारराव व कल्पेकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *